
चित्रपटांमध्ये अनेकदा असे सीन करावे लागतात ज्यासाठी अभिनेता किंवा अभिनेत्री तयार नसतात पण कथेची गरज म्हणून ते सीन नाईलाजाने करावे लागतात . अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती एका अभिनेत्याची कारण हा अभिनेता ज्या अभिनेत्रीला त्याची मुलगी मानायाचा तिच्यासोबतच त्याला किसिंग सीन द्यायचा होता ज्यासाठी या अभिनेत्याच्या मनात फार लाज वाटत होती.
किसिंग सीनबद्दल नेमकं काय म्हणाले अभिनेते
हे अभिनेते म्हणजे अन्नू कपूर. अन्नू कपूर हे इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. ज्यांनी पडद्यावर विविध प्रकारची पात्रे साकारली आहेत. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच ते एक स्पष्टवक्ता देखील आहेत. ते कोणत्याही मुद्द्यावर त्यांची अगदी ठाम मते मांडतात. अन्नू कपूरने त्यांच्या कारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान, कपूर आता त्याच्या अलीकडील मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. ज्यामध्ये त्यांनी प्रियांका चोप्रासोबतच्या त्या किसिंग सीनबद्दल खुलासा केला आहे. दरम्यान या मुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. या सीनवेळी त्यांची काय अवस्था होती हे देखील त्यांनी सांगितले होते.
किसिंग सीनबद्दल टीकाही करण्यात आली
अन्नू कपूर यांनी एका पॉडकास्ट दरम्यान अन्नू यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते त्यांच्या चित्रपटसृष्टीतील आयुष्यापर्यंतच्या अनेक मनोरंजक प्रश्नांची उत्तरे दिली आहे. तर याच मुलाखतीत त्यांनी सर्वत्र चर्चा झालेल्या प्रियंका चोप्रासोबतच्या त्यांच्या किसिंग सीनबद्दलही खुलासा केला आहे. कारण अनेदा असं दिसून आलं आहे की, अन्नू कपूरसोबत अनेकदा प्रियांकासोबतच्या या सीनबद्दल विचारणा करण्यात येते. एवढं नाही तर गुगलवर अन्नू कपूर यांचे नाव सर्च केल्यास त्यांचे आणि प्रियांकाचे नाव येते , दुसरं म्हणजे त्यांच्या किसिंग सीनबद्दल सर्च केलं जातं. तसेच यामुळे वाद निर्माण झाल्याचंही म्हटलं जातं. प्रियांका आणि अन्नू कपूर यांच्यामध्येही काही मतभेद झाल्याचं म्हटलं जातं. हे सर्व घडलं आहे ते “सात खून माफ” या चित्रपटाच्या वेळी.
अभिनेता अभिनेत्रीला मुलगी मानत असे?
दरम्यान अन्नू कपूर यांनी या वादाबद्दल आणि या सीनबद्दल सांगितलं की, “प्रियंकाचे दिवंगत वडील कर्नल साहेब यांच्याशी माझे चांगले संबंध होते. ते अनेकदा मला भेटत असत. मी सेटवर प्रियंकाला ‘बेटी’ म्हणायचो. मी तिला मुलगी मानायचो. आणि तिला सांगितले देखील की तिला हा सीन करायचा आहे. आता, अशा परिस्थितीत, ती नक्कीच संकोच करेल असं मला वाटलं होतं”
कोणत्या सीनमुळे गोंधळ उडाला?
अन्नू पुढे म्हणाले, “मी शेवटी विशालला तो सीन काढून टाकण्यास सांगितलं.” तसेच त्यांना जेव्हा मुलाखतीत विचारले गेले की त्यांच्या मनात तिच्याबद्दल काही भावना आहेत का? तेव्हा अन्नू म्हणाले, “नाही, मला त्या नव्हत्या. पण हो, जर मी तिला ‘मुलगी’ म्हटले तर त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. त्यावेळी हा सर्व मीडिया स्टंट होता. मला वाटते की प्रियांका याबद्दल काहीही बोलली नसती.” असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.