Love And War : रणबीर पाठोपाठ आलिया भट्टचा फर्स्ट लूक OUT, विकी कौशल कधी दिसणार ?
Love And War : संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला 'लव्ह अँड वॉर' या बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल बरीच चर्चा आहे. कालच या चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक रिलीज झाला तर आता त्यापाठोपाठ त्याची पत्नी आणि या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री आलिया भट्टचाही फर्स्ट लूक समोर आला आहे.

Love And War : संजय लीला भन्साळी यांचा अपकमिंग चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. कालच (24 सप्टेंबर) या चित्रपटातील अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) शानदार लूक जारी करण्यात आला. त्याच्या लूकची दोन पोस्टर्स रिलीज झाली. तर आता त्यापाठोपाठ चित्रपटातील अभिनेती आलिया भट्टचाही (Alia Bhatt) फर्स्ट लूक ऑफिशिअली समोर आलाय. नवा फोटो समोर येताच आलियाचा लूक सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. जारी करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये आलिया अतिशय ग्लॅमरस आणि स्टनिंग लूकमध्ये दिसत्ये. लाल रंगाचा शिमरी कट आऊटफिटमध्ये ती दिसली. या चित्रटात तिचा अंदाज एकदम वेगळा असेल.
‘लव्ह अँड वॉर’च्या सेटवरून आलिया भट्टचे अनेक फोटो लीक झाले होते. आता निर्मात्यांनी रणबीर कपूरनंतर आलिया भट्टचा फर्स्ट लूकही रिलीज केला आहे. पोस्टरमध्ये आलिया भट्टच्या डोक्यावर एक मोठा क्राऊनही दिसला. स्टेजवर पसरलेले लाईट्समुळे तिच्या या डान्स परफॉर्मन्सच्या लूक अधिक भव्य दिसतोय. पोस्टरमध्ये आलियाचा आत्मविश्वास, ॲटिट्यूड असलेला लूक आणि एक्सप्रेशन्स अगदी कमाल दिसताहेत.
आलिया भट्टचा नवा अंदाज
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांमध्ये अभिनेत्रींचं सादरीकरण अतिशय भव्य पद्धतीने केलं जातं. आता आलिया भट्टचा हा लूकही त्याला अगदी साजेसा ठरला आहे. दरम्यान, आलिया भट्टने चित्रपटातील आपला दुसरा लूकही शेअर केला आहे. पुढल्या वर्षी, म्हणजेच 21 जानेवारी 2027 ला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. यापूर्वी रणबीर कपूरचहे भन्साली प्रॉडक्शनने 2 फोटो शेअर केले होते. आता या दोघांनंतर विकी कौशलच्या लूकचीही चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. कदाचित उद्या त्याचाही पहिला लूक समोर येऊ शकतो.
रणबीरच्या लूकला पसंती
या चित्रपटातील रणबीर कपूरचा समोर आलेला लूक चाहत्यांना चांगलाच पसंत पडलाय. तो अगदी वेगळ्या, इंटेन्स आणि रुबाबदार अंदाजात दिसला. पोस्टरमध्ये तो निळ्या रंगाच्या विंटेज कन्व्हर्टिबल कारमध्ये बसलेला दिसतो. त्याने स्काय ब्लू रंगाचा कॉलर असलेला टी-शर्ट आणि चष्मा घातला . त्यासोबतच हातावर झालेली जखम आणि वहणार रक्त यानेही लोकांचं लक्ष वेधून घेतलं.