55 वर्षीय विवाहित अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती लोकप्रिय अभिनेत्री, गर्भपातासाठी घेतलेले ५ कोटी; कोण आहे ती?

Bigg Boss Fame Actress : ही अभिनेत्री ५५ वर्षीय अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. तिनं गर्भपातासाठी ५० कोटी रुपये घेतल्याचाही दावा करण्यात आलेला. काय घडलेलं? जाणून घ्या.

55 वर्षीय विवाहित अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती लोकप्रिय अभिनेत्री, गर्भपातासाठी घेतलेले ५ कोटी; कोण आहे ती?
| Updated on: Oct 27, 2026 | 4:47 PM

पंजाबी अभिनेत्री लव गिल सध्या बिग बॉसमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. वीकेंड का वॉरमध्ये तन्मयच्या गर्लफ्रेंडनं हजेरी लावत याबद्दल विचारणा केली. त्यानंतर लव गिल म्हणाली, ‘मी आधीच एका वादातून या शोमध्ये आले होते. आता पुन्हा माझं नाव खराब होतंय. माझं तर करिअरच उद्ध्वस्त झालं.’ लव गिलच्या या विधानानंतर तिच्याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. लव गिल नक्की कशाबद्दल बोलत होती? हे चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

काय घडलेलं नेमकं?

Loading...

लव गिलचं नाव प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि कॉमेडियन गुरप्रीत घुग्गीसोबत जोडलं गेलं होतं. ५५ वर्षांच्या विवाहित गुरप्रीतसोबत लव गिल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. या रिलेशनशिपमध्ये लव गरोदर राहिली. कॅनडास्थित एका पॉडकास्टरनं दावा केला की, ही अभिनेत्री घुग्गीच्या मुलाची आई होणार होती. घुग्गीनं हे प्रकरण मिटवण्यासाठी ५ कोटी रुपयांची रक्कम दिल्याचं वृत्त आहे.पण, गुरप्रीत घुग्गीनं हे दावे फेटाळून लावले. यानंतर, लव्ह गिलचा रडतानाचा एक ऑडिओ समोर आला, ज्यात तिनं स्वतःला एक गरीब, संघर्ष करणारी अभिनेत्री म्हटलं होतं. तिनं सांगितलं की, लोक तिला टार्गेट करत आहेत. ती डिप्रेशनमध्ये आहे आणि तिचं करिअर संपले आहे. ती भाड्याच्या घरात राहत होती आणि तिला एक लहान भाऊ आहे, आणि या गोष्टींचा त्याच्यावर कसा परिणाम होईल.

 


मात्र, नंतर पॉडकास्टर्स पुढे आला आणि त्यानं दावा केला की, काही विरोधकांनी घुग्गीविरुद्ध हे आरोप करण्यासाठी त्यांना पैसे दिले होते. नंतर त्यानं आपलं विधान मागं घेतलं आणि दावा केला की घुग्गीनेच त्याला नेगेटिव्ह पीआर करण्यास सांगितलेलं.

 

दरम्यान, २९ वर्षीय पंजाबी अभिनेत्री लव गिलनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. त्यानंतर ती ‘तू पतंग मैं डोर’ या टीव्ही शोमध्ये आणि मग ‘कुडियां जवान बापू परेशन’ या चित्रपटात दिसली. सध्या लव बिग बॉसच्या घरात आपला खेळ चांगल्याप्रकारे खेळत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us