AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadanvis : अभ्यास न करता विरोध सुरू.. कर्जतमधील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले

कर्जतमधील प्रस्तावित टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले आहे. मोठ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमी, स्थानिक आणि विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्र्यांनी भविष्यातील ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कोळशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी असे पंप स्टोरेज प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले, तसेच हा हरित प्रकल्प असल्याचे नमूद केले.

Devendra Fadanvis : अभ्यास न करता विरोध सुरू.. कर्जतमधील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?
| Updated on: Oct 27, 2026 | 4:56 PM
Share

कर्जतमधील प्रस्तावित टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी कर्जत आणि भीमाशंकर अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप होत आहे. यावरून पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षांकडून या कारवाईला तीव्र विरोध केला जात आहे.  तसेच या वृक्षतोडीमुळे परिसरातील नैसर्गिक अधिवास, जैवविविधता आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींच्या मते, विकासाच्या नावाखाली जंगल आणि नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होऊ नये. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनीही रान उठवत सरकारला धारेवर धरलं आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी नुकतीच कर्जत येथे जाऊन प्रकल्प परिसराची पाहणी केली. वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून त्यांनी चिंता व्यक्त केली . तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रकल्पाविरोधातील भूमिका स्पष्ट केली आहे. ते 28 ऑक्टोबर रोजी कर्जत येथे जाहीर सभा घेणार आहेत.

या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाबाबत पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकल्पाची संपूर्ण माहिती न घेता आणि त्याचा अभ्यास न करता विरोध केला जात आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. तसेच, हा स्टोरेज प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचे सांगत, कोळसा, प्रदूषणापासून मुक्ती हवी असेल तर पंप स्टोरेज प्रकल्प महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी  नमूद केलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?

कर्जतमधील वृक्षतोडीवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंप स्टोरेज प्रकल्पांची आवश्यकता स्पष्ट केली. ‘ मी पुन्हा एकदा सांगतो, जो काही पंप स्टोरेज प्रकल्प आहे, हा प्रकल्प पूर्णपणे पर्यावरणपूरक अशा प्रकारचा आहे. आपल्याकडे सोलर आणि विंड – या दोन पॉवर आपण जनरेट करतो. पण या दोन पॉवर्स आपल्याला 24 तास काही मिळत नाहीत. 5 वाजल्यानंतर सोलर मिळत नाही, हवा नसेल तर विंड मिळत नाही. त्यामुळे ग्रीडवर त्याचा परिणाम होतो. आणि 24*7 Renewable power आपल्याला देता येत नाही. म्हणून, जगामध्ये आज सोलर आणि विंड या पॉवरला बॅलन्स करण्याकरता आणि ग्रीड स्टॅबिलाईज करून 24*7 पॉवर देण्याकरता, पंप स्टोरेज ही पद्धत वापरली जाते. पंप स्टोरजेमुळे पीक अवरला पूर्णपणे शुद्ध, Renewable power जी कुठलही प्रदूषण करत नाही, ती उपलब्ध होत असते’, असं फडणवीस यांनी सांगितलं. .

‘आपण जर या प्रकल्पाचा विचार केला तर 3 हजार मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. 3 हजार मेगावॅट कोळशाची वीज ही जेव्हा तयार होते, त्यावेळी जे प्रदूषण होतं, ते प्रदूषण मिटिगेट करायचं असेल तर 28 कोटी झाडं लावावी लागणार आहेत. आपण जर पंप स्टोरेजला विरोध केला तर आपल्याला कोलशाचीच वीज वापरावी लागेल आणि ती वीज जर वापरली तर कोट्यवधी झाडं लावावी लागतील, जे अशक्यप्राय आहे’, असं ते म्हणाले.

कोळशावरील अवलंबित्व आणि त्यातून होणारे प्रदूषण कमी करायचं असेल, तर अशा प्रकारच्या प्रकल्पांची गरज असल्याचे त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारने पंप स्टोरेज प्रकल्पांचा समावेश हरित प्रकल्पांच्या श्रेणीत केला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. त्यामुळे अशा प्रकल्पांकडे केवळ वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून न पाहता, याचा योग्य अभ्यास केला, समजून घेतलं पाहिजे,  ते आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. या प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांच्या मनात ज्या शंका आणि आक्षेप आहेत, त्यांचे जे मुद्दे आहेत, ते ऐकून घेण्यास सरकार तयार असल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

 

Follow Us
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात....
Pradeep Purnekar Case : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात; ठाण्यात खळबळ
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी...
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी कोर्टाची थेट कारवाई