AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Arora : अंजली अरोरामुळे 20 लाखांचा फटका? आयोजकांची कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय ?

कानपूरमधील एका इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी अंजली अरोराने 3 लाख रुपये घेतले, मात्र ठरलेल्या वेळेपर्यंत तिने परफॉर्मन्स दिला नाही असा आरोप आहे. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे.

Anjali Arora : अंजली अरोरामुळे 20 लाखांचा फटका? आयोजकांची कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय ?
| Updated on: Oct 27, 2026 | 5:35 PM
Share

सोशल मीडियावर ‘कच्चा बदाम गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली अंजली अरोड़ा पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. कानपूरमध्ये आयोजित एका डांडिया कार्यक्रमातील तिच्या परफॉर्मन्समुळे सुरू झालेला वाद आता चक्क न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांनी अंजलीविरुद्ध न्यायालयात धाव घेतली असून, फसवणूक, मानहानि, धमकी देणे आणि चुकीची माहिती देणे असे आरोप अंजलीवर करत कोर्टात तक्रार नोंदवली आहे. या कार्यक्रमामुळे जवळपास 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे. न्यायालयाने तक्रारकर्त्याचा जबाब नोंदवण्यासाठी 5नोव्हेंबरची तारीख दिली आहे.

हे प्रकरण 15 ऑक्टोबर रोजी कानपूरमधील लाजपत भवन लॉन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नगारा नाईट्स’ कार्यक्रमाशी संबंधित आहे. कानपूर देहातमधील विसायकपूर, सरवनखेड़ा येथील डिजिटल मार्केटिंग कंपनीचे संचालक आशिष कुमार यांनी याप्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

ज्येष्ठ वकील करीम अहमद सिद्दीकी यांच्या माहितीनुसार, या कार्यक्रमाच्या आयोजनात शोर बँडचे संचालक अमन निगम आणि इव्हेंट प्लॅनर अनुभव राज यांचाही सहभाग होता. कार्यक्रमात अंजली अरोराच्या सादरीकरणाबाबत झालेल्या करारावरून हा वाद निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

45 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी ठरले होते 3 लाख रुपये

तक्रारीनुसार, अंजली अरोराची मॅनेजर प्रीती दुबे हिच्याशी चर्चा झाल्यानंतर कार्यक्रमात 45 मिनिटांचे सादरीकरण करण्यासाठी तीन लाख रुपये देण्याचे ठरले होते. याशिवाय, कार्यक्रमाच्या प्रायोजकांचा सन्मान करण्याची जबाबदारीही अंजलीवर होती, असं आयोजकांचं म्हणणं आहे. आयोजकांच्या दाव्यानुसार, अंजली आणि तिच्या टीममधील चार सदस्यांच्या प्रवासासाठी विमानाची तिकिटे, राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची सोयही करण्यात आली होती.

तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, आयोजकांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण 2.75 लाख रुपये जमा केले होते, तर उर्वरित 75 हजार रुपये देणे बाकी होते. 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अंजली आपल्या टीमसह कानपूर विमानतळावर पोहोचली. मात्र उर्वरित मानधन मिळेपर्यंत अंजलीने विमानतळाबाहेर जाण्यास नकार दिला. त्यानंतर आयोजकांनी बाकीची रक्कम दिली आणि अंजली व तिची टीम विमानतळावरून रवाना झाली असं तक्रारदाराचं म्हणणं आहे.

ठरलेल्या वेळेपूर्वीच कार्यक्रम सोडल्याचा आरोप

अंजलीचा परफॉर्मन्स हा रात्री 9 ते 9.45 या वेळेत होणार होते. मात्र, ती रात्री सुमारे 9.45 वाजता स्टेजवर पोहोचली आणि अवघ्या 12 मिनिटांनंतर कार्यक्रम सोडून गेली असा आरोप तक्रारदाराने केला आहे. याशिवाय, कार्यक्रमादरम्यान तिने व्यवस्थापनातील सदस्यांबद्दल नाराजी व्यक्त केली, असाही उल्लेख तक्रारीत आहे.

आयोजकांचा दावा आहे की, अंजलीने ठरलेल्या वेळेनुसार पूर्ण सादरीकरण न केल्यामुळे कार्यक्रमाच्या नियोजनावर परिणाम झाला. परिणामी, प्रायोजकांनी ठरलेली संपूर्ण रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे आयोजकांचे सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथित नुकसानीच्या आधारावर आयोजकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

सोशल मीडियावरील व्हिडीओंमुळे वादाला नवे वळण

या प्रकरणातील वाद केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित राहिला नाही. 19 ऑक्टोबर रोजी अंजली अरोराने इन्स्टाग्रामवर तीन व्हिडीओ शेअर केले.या व्हिडीओंमध्ये तिने कार्यक्रमाच्या व्यवस्थापनावर आणि आपल्याशी करण्यात आलेल्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केलं होतं. यानंतर 22 ऑक्टोबर रोजी आयोजकांनी अंजलीला कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून अंजलीकडूनही मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

आता न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

अंजली अरोरा आणि कार्यक्रमाच्या आयोजकांमधील हा वाद आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. एका बाजूला आयोजकांनी आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि कायदेशीर नोटिसांमुळे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. आता या प्रकरणात न्यायालय काय भूमिका घेतं याकडे लक्ष लागलं आहे.

Follow Us
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात....
Pradeep Purnekar Case : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात; ठाण्यात खळबळ
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी...
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी कोर्टाची थेट कारवाई