नशिबावर नाही, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा! ‘या’ मराठमोळ्या गाण्याचा अर्थ मनाला नवी ऊर्जा देणारा
काही गाणी केवळ ऐकण्यासाठी नसतात, तर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची ताकद त्यांच्यात असते. हे मराठमोळं गाणंही असंच आहे. या गाण्यातून नेमका आपल्याला मोठा संदेश मिळतो.

कधी कधी मन पूर्ण खचलेलं असतं, कष्टाला फळ मिळत नाही आणि नशीब आपल्यालाच दोष देतंय असं वाटतं. अशा वेळी निराशा झटकून टाकून पुन्हा उभं राहण्याची ताकद देणारं एक भारी गाणं म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली’ सिनेमातील ‘मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका…’ या गाण्याबाबत सांगायचं झाल्यास काही गाणी फक्त मनोरंजन करतात, पण ही कलाकृती माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. आपण अनेकदा नशिबाच्या भरोशावर बसून राहतो किंवा परिस्थिती बदलण्याची वाट बघतो. पण हे गाणं आपल्याला आरसा दाखवतं की, नशिबाच्या रेषांवर विश्वास ठेवणयापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, स्वतःच आपली नवी वाट निर्माण करा.
२०१५ मध्ये आलेल्या अभिनेता सुबोध भावेच्या ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाने शास्त्रीय संगीताचा आणि गुरु-शिष्य परंपरेचा एक वेगळाच बाज महाराष्ट्राला दाखवला. या चित्रपटातलं हे गाणं म्हणजे जणू आत्म्याला नवी ऊर्जा देणारी साद आहे. मंदार चोळकर यांचे खोल विचार करायला लावणारे बोल आणि त्याला शंकर-एहसान-लॉय या दिग्गज जोडीचं संगीत. या सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे साक्षात शंकर महादेवन यांच्या आवाजातली ती जादू. त्यांच्या भारदस्त आणि भावपूर्ण आवाजात हे गाणं ऐकताना अंगावर काटा येतो आणि मनात एक नवी जिद्द निर्माण होते.
आयुष्यात कधी असं वाटलं की सगळं संपलंय, अपयश आलंय किंवा स्वतःवरचाच विश्वास ढळायला लागलाय, तर हे गाणं एकांतात नक्की ऐकावंसं वाटतं. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नशिबाची नाही, तर स्वतःच्या कष्टांची जोड लागते, हेच हे गाणं आपल्याला पुन्हा पुन्हाण शिकवतं जातं.
गाण्याचे बोल
मन मंदिरा… तेजाने… ओहो हो मन मंदिरा… तेजाने उजळून घेई साधका मन मंदिरा… तेजाने उजळून घेई साधका संवेदना… संवेदना संवादे सहवेदना जपताना मन मंदिरा… तेजाने उजळून घेई साधका मन मंदिरा…
तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घे रे पाखरा उजळून घेई साधका मन मंदिरा… तेजाने उजळून घेई साधका मन मंदिरा… मन मंदिरा… मन मंदिरा…
