
बॉलीवूडचे दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांच्या एका व्हिडीओतील वक्तव्यावर बॉलीवूड गायक लकी अली संतापले होते. ज्यात जावेद यांनी हिंदूंना मुसलमानांसारखे बनू नका असा सल्ला दिला होता. जावेद यांच्या हिंदू-मुस्लीमांसंदर्भातील वक्तव्यावर लकी अली यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती. त्यांनी जावेद अख्तर सारखे बनू नका असा सल्लाही दिला होता. त्यानंतर आता लकी अली यांनी जावेद अख्तर यांची माफी तर मागितली आहे.परंतू माफी मागतानाही लकी अली यांनी अख्तर यांना टोमणा मारला आहे.
लकी अली यांच्या पोस्टवर वाद वाढल्यानंतर गायक लकी अली यांनी जावेद यांची माफी मागितली आहे. त्यांनी आधी जावेद यांच्यावर संतापून लिहिली होते की जावेद अख्तर सारखे बनू नका. कधी ओरिजनल राहिले नाहीत, खूपच वाईट दृष्ट ( ugly) आहेत. त्यानंतर त्यांनी लेटेस्ट पोस्टमध्ये लिहीलेय की हे माझ्यातर्फे चुकीचे वक्तव्य होते. परंतू त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुन्हा मॉन्स्टर ( राक्षस ) शब्दांचा वापर केला आहे.
जावेद अख्तर यांच्यावर टीका केल्यानंतर लकी अली यांनी पुन्हा जावेद यांच्या तिखट शब्दात टोमणा मारला आहे. त्यांनी जरी माफी मागितली असली तर त्यातही लकी यांनी जावेद यांना दृष्ट म्हटले आहे. लकी अली यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये लिहीलेय की माझ्या मत हे होते की ‘अहंकार वाईट असतो. हे माझ्यावतीने चुकीचे वक्तव्य होते. राक्षसांच्या देखील भावना असू शकतातत आणि मी कोणाच्या दृष्टतेला ठेच पोहचवली असेल तर मी माफी मागतो’
येथे पोस्ट पाहा –
what I meant was that arrogance is ugly…. it was a mistaken communique’ on my part…. monsters may have feelings too and I apologise if I hurt anyones monstrosity…….
— Lucky Ali (@luckyali) October 22, 2025
जावेद यांचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे. त्यात ते म्हणतात की, शोलेत एक सीन होता. त्यात धर्मेंद्र शंकराच्या मूर्तीच्या मागे लपून बोलतात. आणि हेमा मालिनी यांना वाटते की भोले शंकर तिच्याशी बोलत आहेत. आज असा सीन शक्य आहे का ? मी आज असा सीन लिहणार नाही. १९७५ मध्ये हिंदू नव्हते का? कोणी धार्मिक लोक नव्हते का ? वास्तविक मे रेकॉर्डवर आहे. मी ही बाब येथे सांगत नाहीए. राजू हिराणी आणि मी पुण्यात एका मोठ्या ऑडियन्स समोर होतो. आणि मी म्हणालो, ‘मुसमानांसारखे बनू नका. त्यांना आपल्या सारखे बनवा, तुम्ही मुसलमानांसारखे बनत आहात, हे एक संकट आहे’