
बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचे कनेक्शन हे कायमच चर्चेत राहिले आहे. अनेक अभिनेत्रींची नावे अंडरवर्ल्डमधील डॉनशी जोडण्यात आली आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या मागे देखील एक गँगस्टर लागला होता. आता हा किस्सा नेमका काय आहे? चला जाणून घेऊया...

माधुरी दीक्षितच्या मागे दाऊदची गँग लागली होती. पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला आहे. '90च्या दशकता ही घटना घडली आहे. पोलीस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी माधुरी दीक्षितचे प्राण त्यावेळी वाचवले होते. त्यांनीच मला हे सांगितले होते' असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, 'अनिश इब्राहिम हा माधुरी दीक्षितला दुबईला येण्यासाठी दबाव टाकत होता. त्याचे फार वाईट हेतू होते. त्याने अनेक अभिनेत्रींना बोलावले होते. त्यांना महागडे गिफ्ट्स दिले होते. पण त्याची नजर माधुरीवर देखील होती.'

'मात्र, माधुरी त्याच्यासमोर झुकली नाही. तिने थेट दुबईला जाण्यास नकार दिला होता. ते ऐकून अनिश इब्राहिमला प्रचंड राग आला होता. त्याने माधुरीला संपवण्याचा निर्णय घेतला होता. तिची सुपारी दिली होती. पण क्राइम ब्रांचला याविषयी माहिली मिळाली होती' असे जितेंद्र म्हणाले.

नंतर त्यांनी माधुरीचा जीव कसा वाचला याविषयी सांगितले आहे. 'क्राईम ब्रांचने माधुरीला सुरक्षा दिली होती. त्यांचे पूर्ण लक्ष डी गँगच्या हालचालींकडे होते. या सगळ्यामुळे माधुरी परदेशात जाऊन काही वर्षे राहिली' असे ते म्हणाले.