Shivali Parab : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्यानं दिलेली शिवाली परबवरच्या प्रेमाची कबुली? म्हणालेला, ती माझी क्रश…

Maharashtrachi Hasyajatra Fame Actor On Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं एका मुलाखतीत अभिनेत्री शिवाली परबला गंमतीत 'शिवा माझी क्रश' असं म्हटलेलं.

| Updated on: Nov 20, 2026 | 6:07 PM
1 / 5
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील कलाकारांनी आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. यातील अभिनेत्री शिवाली परबदेखील आपल्या अभिनयामुळे आणि विनोदाच्या अनोख्या शैलीमुळे लोकप्रिय झाली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. अशातच हास्यजत्रा फेम अभिनेत्यानं एका मुलाखतीदरम्यान शिवालीवरचं प्रेम व्यक्त केलं होतं.

2 / 5

हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून ओंकार राऊत आहे. ओंकार आणि शिवाली यांचे एकत्र फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यामुळे या दोघांमधील मैत्रीची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा असते.

3 / 5

'स्टार मीडिया मराठी'ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये ओंकारनं शिवालीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मुलाखतीदरम्यान ओंकार आणि शिवाली यांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दोघांची जोडी म्हणून काही वेगळं पाहायला मिळणार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

4 / 5

यावर शिवालीने मिश्किलपणे उत्तर दिलं. ती म्हणाली, 'आता काय आहे ना! महाराष्ट्राची क्रश हे असल्या कारणानं माझ्यावर एक जबाबदारी जास्त आहे. त्यामुळे मला प्रयत्न तर करावेच लागतील.'

5 / 5

त्यानंतर ओंकार म्हणाला, 'शिवा ही महाराष्ट्राची क्रश आहे, माझी पण क्रश आहे.' ओंकारचं हे उत्तर ऐकताच शिवालीनं त्याला 'पर्सनल, पर्सनल' असं म्हणत थांबवलेलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us