Shramesh Betkar : श्वानांना ठराविक काळानंतर सोडून देणाऱ्यांची संख्या वाढतेय, त्यांचे कर्म…’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Maharashtrachi Hasyajatra fame Actor : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश बेटकरनं सोशल मीडियावर पाळीव श्वानांबद्दल केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Shramesh Betkar : श्वानांना ठराविक काळानंतर सोडून देणाऱ्यांची संख्या वाढतेय, त्यांचे कर्म...महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
| Updated on: Nov 19, 2026 | 1:46 PM

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता श्रमेश बेटकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अभिनेता अनेक सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करतो. अशातच आता अभिनेत्यानं केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. पाळीव प्राणी, विशेषतः कुत्र्यांना काही काळ हौसेनं घरी आणायचं आणि नंतर त्यांना रस्त्यावर किंवा जंगलात सोडून द्यायचं, अशा लोकांच्या वृत्तीवर त्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर श्वानांचे गोंडस व्हिडिओ आणि रील्स पाहून अनेकजण कुत्रा पाळण्याचा निर्णय घेतात. मात्र, केवळ आवड किंवा हौस म्हणून प्राणी घरी आणण्यापूर्वी त्याची जबाबदारी पेलण्याची तयारी आहे का, याचा विचार करणं गरजेचं असल्याचं श्रमेशनं म्हटलं आहे.

श्रमेश बेटकरची पोस्ट

Loading...

श्रमेश बेटकरनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘पाळीव प्राण्यांना मुख्यत: श्वानांना एका ठराविक काळानंतर रस्त्यावर, जंगलात सोडून देणाऱ्या लोकांची संख्या वाढतेय. एखाद्या मुक्या जीवाला असं अचानक बेवारस करून, अनाथ करून वाऱ्यावर सोडून दिल्यानंतर त्याच्या मनावर किती खोलवर परिणाम होत असेल याचा विचार देखील आपण करू शकत नाही, तेवढे भावनाबधीर आपण आहोत.’

‘त्यामुळे श्वानांचे रील्स बघून श्वान खरेदी करू नका. जेव्हा कधी श्वान घ्यावासा वाटेल तेव्हा शांत मनाने आरशा समोर उभे राहा, आपल्याला हे झेपणार आहे का हे विचारा ? नाकापेक्षा जड मोती घेण्याची सवय आणि शायनिंग मारायच्या या दुनियेत मी पण एक डॉग घेऊन काहीतरी करतो असा विचार नको. कारण, एक डॉग पाळणं म्हणजे एक मूल वाढवण्यासारखं आहे, त्यासाठी एक माणूस आणि संपूर्ण वेळ द्यावा लागतो. तुमची हौस फिटल्यावर तुम्ही डॉगला सोडून देता आणि मूव्ह ऑन होता, प्राण्यांना ते जमत नाहीत. माणूस प्रोफेशनल आहे, प्राणी प्रामाणिक आहे. माणूस गरजेनुसार नाती बनवतो आणि संपवतो. प्राणी, प्रेम आणि नातं शेवटपर्यंत नेतात. ते जीव लावतात तो कायमसाठीचा असतो, त्यात अटी शर्थी नसतात. त्यामुळे त्यांचं हृदय तुटतं ते जीवघेणं असतं.

 

‘त्यामुळे ज्यांना प्राण्यांना शेवटपर्यंत सांभाळता येणार नसेल त्यांनी त्यांना विकत घेऊन घरी आणायचा विचार देखील करू नये . आणि जे कुणी असं एका निष्पाप जीवाला वाऱ्यावर सोडून देत असतील त्यांचे कर्म महाप्रचंड वेगाने त्यांच्याकडे येतीलच. हिशोब सगळ्यांचा इथेच होतो.’ असं श्रमेशनं शेवटी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us