Mahesh Babu : महेश बाबूच्या घरात कोरियन सूनेची एन्ट्री, तेलुगू रितीरिवाजांनुसार पार पडला शाही विवाह सोहळा
Mahesh Babu : साउथ सुपरस्टार महेश बाबू याच्या कुटुंबात कोरियन सूने एन्ट्री झाली आहे. तेलुगू रितीरिवाजांनुसार शाही विवाह सोहळा पार पडला. सध्या या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, पण कोणत्याच फोटोमध्ये अभिनेता दिसला नाही.

Mahesh Babu : साउथ सुपरस्टार महेश बाबू सध्या त्याच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, कुटुंबातील आनंदाच्या क्षणांमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबात सध्या लग्नाचं वातावरण आहे. महेश बाबू याचा भाचा सिद्धार्थ गल्ला याचं मोठ्या शाही थाटात लग्न सोहळा पार पडला आहे. सिद्धार्थ याने किरियन गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. त्याच्या कोरियन बायकोचं नाव Hyeon Kim असं आहे. या शाही विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लग्नासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं.
असं सांगण्यात येत आहे की, सिद्धार्थ गल्ला याने साउथ कोरियन गर्लफ्रेंड Hyeon Kim हिच्यारोबत पारंपरिक तेलुगू रितीरिवाजांनुसार लग्न केलं आहे. या लग्नात मित्र परिवार आणि कुटुंबातील मंडळी सामिल होती. व्हायरल होत असलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत दोघांना देखील नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महेश बाबूची बहीण मंजुला यांनी शेअर केले लग्नाचे फोटो..
कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, सिद्धार्थ गल्ला माजी खासदार आणि उद्योगपती गल्ला जयदेव यांचा लहान मुलगा आहे. त्यांच्या लग्नाला केवळ गल्ला आणि घट्टामनेनी कुटुंबातील जवळचे सदस्य आणि वधूचे नातेवाईक उपस्थित होते. या लग्नाचे फोटो महेश बाबूची बहीण मंजुला घट्टामनेनी यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहेत.
एकाही फोटोत नाही दिसला महेश बाबू…
हेश बाबूची बहीण मंजुला घट्टामनेनी यांनी सोशल मीडियावर सात फोटो पोस्ट केले आहे. या सात फोटोंपैकी एकाही फोटोमध्ये महेश बाबू आणि अभिनेत्याची बायको नम्रता शिरोडकर नव्हती… अशात लोकं एकच प्रश्न उपस्थित करत आहेत आणि तो म्हणजे, अभिनेता भाच्याच्या लग्नात का आला नाही?
एस. एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ सिनेमात महेश बाबू व्यस्त
महेश बाबू सध्या एस. एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन हे देखील दिसणार आहेत. मात्र, सध्या या सिनेमाची रिलीज डेट बदलणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. चाहते सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत.