AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज फक्त 300 रुपयांची करा बचत अन् 5 वर्षात मिळवा 6.42 लाख रुपये! जाणून घ्या Post Office ची स्कीम

जर तुम्हाला छोट्या बचतीतून मोठी रक्कम उभी करायची असेल, तर पोस्ट ऑफिसची ५ वर्षांची एक स्कीम एक उत्तम पर्याय ठरू शकते. या गुंतवणुकीबद्दल, मिळणाऱ्या व्याजाबद्दल आणि सुरक्षिततेबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या.

दररोज फक्त 300 रुपयांची करा बचत अन् 5 वर्षात मिळवा 6.42 लाख रुपये! जाणून घ्या Post Office ची स्कीम
post office schemes
| Updated on: Nov 26, 2026 | 8:48 AM
Share

सध्या बचत करणे फार महत्त्वाचे आहे. बचतीची सवय ही नेहमीच आपल्यासाठी फायदेशीर ठरते. जर लहान बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली, तर काही वर्षांत एक मोठी रक्कम उभी राहू शकते. जर तुम्ही दररोज सुमारे ३०० रुपयांची बचत करू शकलात म्हणजेच तुम्ही महिन्याला अंदाजे ९,००० रुपये इतकी होते. ही रक्कम पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या ‘रिकरिंग डिपॉझिट’ (RD) स्कीममध्ये जमा केल्यास, मुदतपूर्तीनंतर तुमच्याकडे सुमारे ६.४२ लाख रुपयांचा निधी जमा होऊ शकतो. चला या स्कीमबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या.

दररोज ३०० रुपये वाचवल्यास कसा होतो फायदा?

दररोज ३०० रुपये वाचवल्यास याचे महिन्याच्या शेवटी सुमारे ९,००० रुपयांची बचत होते. मात्र, एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे: ‘रिकरिंग डिपॉझिट’ (RD) मध्ये पैसे दररोज जमा केले जात नाहीत, तर दरमहा एक निश्चित हप्ता दर महिन्याला भरला जातो. त्यामुळे, जर तुमचे ध्येय दररोज ३०० रुपये वाचवण्याचे असेल, तर दरमहा ९,००० रुपये बाजूला काढून त्या रकमेतून तुमच्या RD चा हप्ता भरा.

वर्षांनंतर किती रक्कम मिळेल?

पोस्ट ऑफिसच्या ‘रिकरिंग डिपॉझिट’ (RD) स्कीममध्ये दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते. सध्या, ५ वर्षांच्या RD योजनेवर वार्षिक ६.७% व्याजदर दिला जातो, ज्याची गणना त्रैमासिक चक्रवाढ पद्धतीने केली जाते. याचा हिशोब खालीलप्रमाणे आहे:

मासिक हप्ता: ₹९,०००

कालावधी: ५ वर्षे (म्हणजेच ६० महिने)

एकूण जमा रक्कम: ₹९,००० × ६० = ₹५,४०,०००

व्याजदर: वार्षिक ६.७%

अंदाजित व्याज: सुमारे ₹१,०२,२९२

मॅच्युरिटी रक्कम (मुदतपूर्तीनंतर मिळणारी एकूण रक्कम): सुमारे ₹६,४२,२९२

थोडक्यात सांगायचे तर, ५ वर्षांच्या कालावधीत तुम्ही स्वतःच्या खिशातून सुमारे ₹५.४० लाख जमा कराल आणि त्यावर सुमारे ₹१.०२ लाख इतके अतिरिक्त व्याज मिळेल.

सुरुवात करण्यासाठी किमान किती रक्कम असावी

तुम्ही या स्कीममध्ये अगदी कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करू शकता. अधिकृत माहितीनुसार, वर सांगितलेल्या या आरडीमध्ये दरमहा जमा करायची किमान रक्कम १०० रुपये आहे. त्यानंतर, ही रक्कम १० रुपयांच्या पटीत वाढवता येते. ठेव रकमेवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. आरडीचा सामान्य कालावधी ५ वर्षांचा असतो, जो पुढे वाढवताही येतो. थोडक्यात सांगायचे तर, ज्यांना दररोज ३०० रुपयांची बचत करणे कठीण वाटते, ते आपल्या सोयीनुसार कमी रकमेपासून सुरुवात करू शकतात.

Follow Us
शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
Rohit Pawar : शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
Abhijeet Dipke : गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा सवाल
पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती स्पष्ट करा; हायकोर्टाचे आदेश
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!