इथेच तुकडे करून टाकेन..; 15 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटावरील कमेंट ऐकताच माही विजचा संताप अनावर

Bigg Boss 20: या प्रकरणावर आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत. माहीच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख करणं योग्य की अयोग्य, यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. आता वीकेंड का वारमध्ये सलमान खान या वादावर काय भूमिका घेतो, याकडे बिग बॉसच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

इथेच तुकडे करून टाकेन..; 15 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटावरील कमेंट ऐकताच माही विजचा संताप अनावर
जय भानुशाली आणि माही विज
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 12, 2026 | 11:04 AM

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’ च्या घरात सध्या स्पर्धकांमधील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. टास्कच्या नावाखाली आता स्पर्धक एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावरही बोलू लागले आहेत. अभिनेत्री माही विज आणि लव्ह गिल यांच्यातील वादाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. माहीने लव्हला ‘होमब्रेकर’ म्हटल्याचा राग मनात धरून लव्हने थेट माहिच्या घटस्फोटाचा विषय काढला. अभिनेता जय भानुशालीसोबतच्या नात्याचा उल्लेख होताच माही प्रचंड संतापली. तिला अश्रू अनावर झाले आणि तिने लव्हला चांगलंच सुनावलं. या वादाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘माझ्या घटस्फोटाबद्दल बोलण्याची हिंमत करू नकोस’

बिग बॉसच्या घरात नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन टास्कदरम्यान हा वाद सुरू झाला. उदितीने माहीला नॉमिनेट केल्यानंतर माहीने लव्हला ‘होमब्रेकर’ म्हटल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यावरून लव्हचा पारा चढला. तिने माहीच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख करत जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटाचा विषय चर्चेत आणला. हे ऐकताच माही संतापली. ‘माझ्या वैयक्तिक आयुष्यापासून दूर राहा. माझ्या घटस्फोटाबद्दल बोलण्याची हिंमत करू नकोस. माझ्या नवऱ्याला या सगळ्यात कधीही मध्ये आणू नकोस’, अशा शब्दांत तिने लव्हला सुनावलं. यावेळी माही भावूक झाली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. रागाच्या भरात तिने ‘इथेच तुकडे करून टाकेन’, अशा आक्रमक शब्दांतही प्रतिक्रिया दिली.

Loading...

पहा व्हिडीओ-

‘होमब्रेकर’ या शब्दावरून सुरू झाला वाद

या संपूर्ण वादाची सुरुवात माहीने लव्हसाठी वापरलेल्या ‘होमब्रेकर’ या शब्दामुळे झाली. लव्हने तिला ‘पिंग पॉन्ग’ असं म्हटल्यानंतर स्काऊट ओपीसोबत झालेल्या संभाषणात माहीने हा शब्द वापरल्याचं स्पष्ट केलं. लव्हला हा शब्द खटकला आणि तिने त्यावरून माहीला जाब विचारला. माहीने मात्र हा उल्लेख काश्वी किंवा घराबाहेरील कोणत्याही व्यक्तीशी संबंधित नसल्याचं सांगितलं.

माही आणि लव्ह यांच्यातील वादात युंग डीएसए आणि अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनीही उडी घेतली. एखाद्या महिलेला नॅशनल टेलिव्हिजनवर ‘होमब्रेकर’ म्हणणं ही मोठी गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं. यंगने माहीच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित करत तिच्या मुलीचा ताराचा उल्लेखही केला. त्यामुळे घरातील वातावरण आणखी तापलं. एका टास्कदरम्यान माहीला तिच्या वक्तव्यांबद्दल जाब विचारण्यात येत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

जय भानुशाली आणि माही विज यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. मात्र, 2026 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल याआधीही अनेकदा चर्चा झाली आहे. बिग बॉसच्या घरात जयचा उल्लेख झाल्यानंतर माही भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. लव्हसोबतचा वाद वाढल्यानंतर माही रडतच तिथून निघून गेली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us