Malaika Arora | पत्नी समजून निर्मात्याने पकडला मलायका अरोराचा हात; पुढे जे घडलं ते पहाच..

अर्जुन आणि मलायका हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर एकमेकांसोबत पोस्ट केलेले फोटो असो किंवा एखाद्या कार्यक्रमात लावलेली एकत्र हजेरी असो, ही जोडी नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते.

Malaika Arora | पत्नी समजून निर्मात्याने पकडला मलायका अरोराचा हात; पुढे जे घडलं ते पहाच..
Arjun Kapoor and Malaika Arora
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 11, 2023 | 8:12 AM

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा कधी तिच्या फिटनेसमुळे तर कधी तिच्या रिलेशनशिपमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. फॅशनशी संबंधित कोणताही कार्यक्रम असला तर तिथे मलायका आवर्जून हजेरी लावते. त्याचप्रमाणे वयाची पंचेचाळीशी ओलांडल्यानंतरही ती फिटनेसबाबत खूप जागरूक असते. सध्या मलायका पुन्हा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे तिचा एक व्हिडीओ. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात मलायका अत्यंत ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळतेय. मात्र यावेळी मलायकाच्या लूककडे नाही तर दुसऱ्याच गोष्टीकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं. या कार्यक्रमात मलायकासोबत बॉलिवूड निर्माते रितेश सिधवानी आणि त्यांची पत्नीसुद्धा उपस्थित होती.

हे तिघे एकत्र असताना रितेश सिधवानी यांच्याकडून झालेल्या चुकीची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. रितेश फोनवर बोलत असतात आणि त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि मलायका उभे असतात. मात्र जसे ते पुढे चालत जातात, तेव्हा अचानक मलायकाचा हात आपल्या पत्नीचा हात समजून पकडून घेतात. रितेश सिधवानी हात पकडताच मलायका अनकम्फर्टेबल होते. आपला हात सोडवून घेत ती ड्रेस सांभाळते आणि पुढे निघून जाते.

मलायका आणि रितेश सिधवानी यांच्या या व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. रितेश यांनी ही चूक जाणूनबुजून केली असं काहीजण म्हणतायत. तर काहीजण ही नकळत झालेली चूक असा अंदाज लावत आहेत. एका युजरने असंही म्हटलंय की जर अर्जुन कपूर तिथे असता तर रितेश यांचं काही खरं नसतं.

अर्जुन आणि मलायका हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर एकमेकांसोबत पोस्ट केलेले फोटो असो किंवा एखाद्या कार्यक्रमात लावलेली एकत्र हजेरी असो, ही जोडी नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाबाबत चर्चांना उधाण आलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायका लग्नाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

“मी लग्नाबद्दल नक्कीच विचार केला आहे. लोकांना असं वाटत असेल की मी पुन्हा लग्न करण्याबाबत नकारात्मक असेन, पण हे खरं नाहीये. मला लग्नसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तितकाच मला प्रेमावरही विश्वास आहे. मी पुन्हा लग्न कधी करेन हे मी सांगू शकत नाही, कारण एखाद्याच्या आयुष्यातील काही गोष्टी सरप्राइज म्हणून राहिलेल्याच बऱ्या असतात. मला सतत प्लॅनिंग करायलाही आवडत नाही”, असं ती म्हणाली.