
मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिच्या नवीन रिलीज झालेल्या गाण्यामुळे. यो यो हनी सिंगसोबत मलायका अरोराचे “चिलगम” हे नवीन गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यामुळे मलायका अरोरा चांगलीच अडचणीत सापडली असून तिला खूप ट्रोल केलं जात आहे. याचं कारण म्हणजे तिने या गाण्यात केलेल्या काही डान्स स्टेप्स.
सोशल मीडियावर गाण्यावर जोरदार टीका
गाण्यात काही ठिकाणी मलायका अशा काही स्टेप्स करताना दिसत आहे त्याबद्दल लोक थेट त्याला अश्लील म्हणत आहेत, तिला ट्रोल करत आहेत. हे गाणे जितके ग्लॅमरस आहे तितकेच ते बोल्डपद्धतीने सादर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर लोक या गाण्यावर जोरदार टीका करत आहेत.हनी सिंगच्या “चिलगम” या म्युझिक व्हिडिओमध्ये मलायका अरोराच्या आक्षेपार्ह डान्स स्टेप्समुळे लोक संतापले आहेत.
मलायका म्हणाली “बोल्ड”
पण आता या गाण्यावरून होणारा वाद आणि ट्रोलिंग लक्षात घेता मलायकाने तिचं स्पष्ट मत मांडलं आहे. अभिनेत्रीने स्पष्टपणे सांगितले आहे. तिने गाण्याला “बोल्ड” म्हटले आणि ते “ग्लॅमर आणि वेडेपणाचे मिश्रण” असं वर्णन तिने केले आहे. तसेच तिचा हनी सिंगसोबतचा काम करण्याचा अनुभव कसा होता हे सांगताना तिने म्हटलं की, ती हे गाणे परफॉर्म करताना फारच आनंद झाल्याचं तिने सांगितले.
म्युझिक व्हिडिओला ‘बोल्ड अन् मजेदार’ म्हटल्याने मलायकावर संतापले लोक
तिने पुढे म्हटले “चिलगममध्ये काम करणे मजेदार होते, ते धाडसी आहे, जोशने भरलेले आहे. यो यो हनी सिंगची ऊर्जा संसर्गजन्य आहे. सेटवर असताना तुम्ही त्याच्या उत्साहाची तुलना करू शकत नाही,” मलायकाने एका मुलाखती दरम्यान तिची गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान ट्रोलिंग होत असतानाच तिने म्युझिक व्हिडिओला ‘बोल्ड अन् मजेदार’ म्हटल्यानंतर तर लोक तिच्यावर अजूनच भडकल्याचं चित्र दिसत आहे.
मलायका अरोरा पुढे म्हणाली, “हे तुमचा मूड लगेचच चांगला करतो. त्यामुळे मला पडद्यावर माझी निश्चिंत बाजू व्यक्त करता आली. मला वाटते की प्रेक्षकांनाही ती ऊर्जा जाणवेल.” मलायकाची प्रतिक्रियाही काही चाहत्यांना अजिबात आवडली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
युजर्सच्या कमेंट्स
मात्र मलायका अरोराच्या या म्युझिक व्हिडिओवर तीव्र टीका होत आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओचा टीझर शेअर झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी निराशा व्यक्त केली आहे. युजर्नृसने म्हटलं की “चिलगम” या गाण्यावर एका युजरने लिहिले, “ती ते बरोबर करू शकत नाही आणि म्हणूनच ते अश्लील दिसत आहे. “मेरे मेहबूब” या गाण्यात तृप्तीसोबतही असेच घडल्याचं उदाहरणही एका युजरने दिलं आहे. तर एका युजरने म्हटलं की, ” हे कोरियोग्राफर सर्वात अश्लील स्टेप्स घेऊन येतात आणि नंतर जर ती अभिनेत्री ते करू शकत नसेल तर तिला ऑनलाइन ट्रोल केलं जातं” , तर काही नेटकऱ्यांनी तर थेट हा व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती केली आहे.”