रस्त्यावरचा कचरा उचलताना दिसली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…

Malaika Arora | मलायका अरोरा रस्त्यावर पडलेला कचरा उचलताना दिसली, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल..., सध्या सर्वत्र मलायाक हिच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा... अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

रस्त्यावरचा कचरा उचलताना दिसली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...
| Updated on: May 28, 2024 | 3:56 PM

अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका हिचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री रस्त्यावर पडलेला कचरा उचलताना दिसत आहे. अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. चाहते अभिनेत्रीचं कौतुक करताना दिसत आहेत.

मलायका नेहमीनुसार, जीमसाठी जात होती. तेवढ्यात अभिनेत्रीला रस्त्यात कचरा दिसला. तेव्हा अभिनेत्रीने सर्व कचरा हाताने गोळा करत आत असलेल्या कचरापेटीत टाकला. मलायका हिची ही कृती पाहुन चाहते देखील अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

 

 

एक नेटकरी मलायका हिचं कौतुक करत म्हणाला, ‘अशा गोष्टी प्रमोट करायला हव्यात…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मलायकाने मन जिंकल…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘कॅमेऱ्यासमोर कोणीही चांगलं राहण्याचा प्रयत्न करत असतो…’ असं म्हणत अभिनेत्रीला ट्रोल देखील करत आहेत.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मलायका फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून मलायक अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

मलायका करणार दुसरं लग्न?

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट 2017 मध्ये झाला. त्यानंतर 2019 मध्ये मलायका हिने अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली. अनेकदा अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे एकसोबत स्पॉट देखील करण्यात आलं आहे. लवकरच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे लग्न करणार असल्याची देखील जोरदार चर्चा रंगलेली असते. ‘योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती भेटल्यानंतर नक्की लग्न करेल…’ असं वक्तव्य देखील अभिनेत्रीने केलं होतं.