मलायकाच्या मुलाने त्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या व्यक्तीचा केला खुलासा; म्हणाला “ती नंबर 1..”

अरहानच्या आयुष्यात 'या' व्यक्तीचं खूप महत्त्वाचं स्थान; आई मलायकासमोरच केला खुलासा

मलायकाच्या मुलाने त्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या व्यक्तीचा केला खुलासा; म्हणाला ती नंबर 1..
मलायका अरोरा, अरहान खान
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 19, 2022 | 9:45 AM

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोराचा ‘मूव्हींग इन विथ मलायका’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवरील या शोमध्ये मलायकाने तिच्या खासगी आयुष्यातील बरेच खुलासे केले. तिच्या या शोमध्ये नुकतीच मुलाने हजेरी लावली. अरहानसुद्धा या शोमध्ये आईसोबतच्या नात्याबद्दल आणि इतरही बऱ्याच गोष्टींबद्दल गप्पा मारताना दिसणार आहे. या एपिसोडमध्ये अरहानने त्याच्या आयुष्यातील आणखी एका खास व्यक्तीचा उल्लेख केला. अरहानच्या आयुष्यात त्या व्यक्तीचं स्थान आता हळूहळू पहिल्या क्रमांकावर येऊन पोहोचत असल्याचं त्याने सांगितलं.

मूव्हिंग इन विथ मलायका या शोमध्ये अरहान म्हणतो, “मी अमूच्या (अमृता अरोरा) बाजूने आहे. कारण ती तुझी (मलायका) जागा घेण्यासाठी स्वत: खूप प्रयत्न करत असते. माझ्यासाठी ती दुसऱ्या आईसारखीच आहे. मात्र मला असं वाटतंय की ती आता पहिल्या स्थानावर येतेय.”

मावशी अमृता अरोरासोबत अरहानचं खूप खास नातं आहे. मुलाचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर मलायकाची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं. मलायका आणि अमृता या दोन्ही बहिणींमध्येही खूप मैत्रीपूर्ण नातं आहे. मलायकाच्या प्रत्येक चढउतारांमध्ये तिने साथ दिली.

मलायकाने 2017 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. या दोघांना 20 वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. विभक्त झाल्यानंतरही मुलासाठी या दोघांना नेहमीच एकत्र आल्याचं पाहिलं गेलं. अरहान अमेरिकेत फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतोय. विमानतळावर त्याला सोडायला जाताना किंवा तो परतल्यावर त्याला आणायला जाताना नेहमीच मलायका आणि अरबाजला एकत्र पाहिलं जातं.

अरबाजच्या कुटुंबीयांकडूनही अरहानचे खूप लाड होतात. मुलाखातर ते आजही माझी काळजी करतात, असं खुद्द मलायका तिच्या शोमध्ये म्हणाली होती. मावशी अमृता अरोराचाही तो लाडका आहे.