Malaika Arora: एकाच पार्टीत मलायका अरोराचे दोन्ही बॉयफ्रेंड आले समोरासमोर, पुढे नेमकं काय घडलं?

Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. सध्या खासगी आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेत्री एकाच पार्टीत एक्स बॉयफ्रेंड आणि सध्याच्या बॉयफ्रेंडसोबत दिसली.

Malaika Arora: एकाच पार्टीत मलायका अरोराचे दोन्ही बॉयफ्रेंड आले समोरासमोर, पुढे नेमकं काय घडलं?
Malaika Arora
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 06, 2026 | 8:59 AM

बॉलिवूडमधील अतिशय हॉट आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मलायका अरोरा ओळखली जाते. मलायका अरोरा तिच्या आयटम साँगसोबतच खासगी आयुष्यामुळे कामयच चर्चेत असते. मलायका आरोरा एकेकाळी अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती. मात्र, त्या दोघांचा ब्रेकअप झाला. आता मलायका एका उद्योगपतीला डेट करताना दिसत आहे. आता एका पार्टीमध्ये मलायका नव्या बॉयफ्रेंडसोबत दिसली आणि तेथेच अर्जुन कपूर देखील असल्याचे समोर आले.

बॉलिवूडमधील एका दिवाळी पार्टीमध्ये मलायकाने हजेरी लावली. या पार्टीमध्ये तिने आकर्षक गुलाबी आणि पांढऱ्या चमकदार लेहेंगा घातला होता. तिनो तो पांढऱ्या टॉपसोबत घातला होता. अभिनेत्रीने या ड्रेसवर गळ्यात डायमंडचा नेकलेस आणि रिग्ज घातल्या होत्या. या पार्टीमधील मलायकाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत.

Loading...

व्हिडीओमध्ये दिसत आहे की मलायका एकटीच रेड कार्पेटवर चालताना आणि सोलो फोटो काढताना दिसत आहे. मात्र नंतर तिच्या बी-टाउन मित्रमैत्रिणींनी तिला ग्रुप फोटोसाठी साथ दिली. त्यानंतर मलायकाच्या मागून तिचा कथित बॉयफ्रेंड हर्ष मेहता रेड कार्पेटवर पटन जाताना दिसला. तो पुढे उभ्या असलेल्या मलायकासोबत पार्टीत जातो. संध्याकाळच्या थीमशी सुसंगत राहून हर्ष भारतीय सूटमध्ये दिसला. मान खाली घालून तो पार्टीत गेला आणि नंतर मलाइकासोबतच बाहेर पडताना दिसला.

दोघांनी संवादही साधला नाही

दरम्यान, या पार्टीत सर्वांचे लक्ष होते अभिनेता अर्जुन कपूरवर. या पार्टीला अर्जुन कपूर देखील उपस्थित होता. त्याने देखील सुंदर पेहराव करुन मनीष मल्होत्राच्या पार्टीत हजेरी लावली. पण मलायकाचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन आणि सध्याचा बॉयफ्रेंड हर्ष दोघेही एका पार्टीत उपस्थित असल्यामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. कारण मलायका आणि अर्जुन यांनी पार्टीत एकमेकांशी संवादही साधला नाही.

पार्टीत इतर कलाकारही हजर

मनीष मलहोत्राच्या दिवाळी पार्टीत चित्रपट उद्योगातील अनेक सदस्य एकत्र आले होते. सेलिब्रिटींनी उत्सव शैलीदार पद्धतीने साजरा केला. अनेक स्टार जोडप्यांनीही या उत्सवात भाग घेतला, ज्यात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय, सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्यासह इतर अनेक तारे सामील होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us