AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेडिकल इमर्जन्सीचं कारण देऊन अभिनेत्रीने डॉक्टरला फ्लॅटवर बोलवलं, त्याला खुर्चीत बसवलं अन्..पुढे अपेक्षा नव्हती असं घडलं

मेडिकल इमर्जन्सीचं कारण देऊन एका अभिनेत्रीने डॉक्टरला फ्लॅटवर बोलवून घेतलं. अथुल्याच्या एका नातेवाईकाची तब्येत बिघडली असून इमर्जन्सीमध्ये मेडिकल सेवा हवी असल्याचं कारण देऊन या डॉक्टरला फ्लॅटवर बोलवण्यात आलं.

मेडिकल इमर्जन्सीचं कारण देऊन अभिनेत्रीने डॉक्टरला फ्लॅटवर बोलवलं, त्याला खुर्चीत बसवलं अन्..पुढे अपेक्षा नव्हती असं घडलं
Athulya Chandra-Bibin Perumbilli
| Updated on: Nov 06, 2026 | 8:59 AM
Share

मेडिकल इमर्जन्सीचं कारण देऊन एका डॉक्टरला फ्लॅटवर बोलवून त्याला लुटण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून यात एक अभिनेता आणि अभिनेत्रीचा समावेश आहे. कोच्चीमध्ये ही घटना घडली आहे. डॉक्टरला मारहाण करुन त्याच्या जवळच्या 3.5 लाखाच्या वस्तू लुटण्यात आल्या. मल्याळम अभिनेत्री अथुल्या चंद्रा आणि अभिनेता-निर्माता बिबीन पेरुमबिल्ली या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण 12 जणांचा आरोपींच्या नावामध्ये समावेश आहे. पोलीस अन्य आरोपींच्या भूमिकेचा सुद्धा तपास करत आहेत.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार दोन नोव्हेंबर 2026 रोजी कोच्चीच्या एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. अथुल्याच्या एका नातेवाईकाची तब्येत बिघडली असून इमर्जन्सीमध्ये मेडिकल सेवा हवी असल्याचं कारण देऊन या डॉक्टरला फ्लॅटवर बोलवण्यात आलं. ही घटना घडण्याआधीपासून डॉक्टर अभिनेत्रीला ओळखत होता. तिच्या विनंतीवरुन हा डॉक्टर त्या अपार्टमेन्टमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर त्याने पाहिलं की 12 जण आधीपासूनच तिथे आहेत.

अथुल्यावर शिवीगाळचा आरोप

डॉक्टरच्या तक्रारीनुसार, त्याला जबरदस्तीने खुर्चीवर बसवून मारहाण करण्यात आली. बिबीने त्याच्या कानाखाली मारली. पोटात ठोसे लगावले. तिथे हजर असलेल्या अन्य लोकांनी सुद्धा डॉक्टरला मारहाण केली. आरोपींनी या डॉक्टरचा फोन, स्मार्टवॉच आणि वायरलेस इअरफोन त्याच्याकडून हिसकावून घेतले. चोरलेल्या या आयट्मसची किंमत तीन ते साडेतीन लाख रुपयांच्या घरात आहे. अथुल्यावर तिने शिवीगाळ केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप आहे. आरोपींनी या डॉक्टरलाा उलटी तक्रार दाखल करण्याची धमकी सुद्धा दिली. ड्रग्स देऊन लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्याच आरोप तुझ्यावर करु असं सांगून सुद्धा या डॉक्टरला धमकावलं.

5 नोव्हेंबरला ताब्यात घेतलं

ही घटना दोन नोव्हेंबर रोजी घडली. त्यानंतर त्याने लगेच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. अथुल्या आणि बिबीनला पोलिसांनी 5 नोव्हेंबरला ताब्यात घेतलं आहे. अन्य आरोपींना सुद्धा अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. अथुल्या चंद्रा आणि बिबीन पेरुमबिल्ली अनेक दक्षिण भारतीय चित्रपटात काम केलं आहे. अथुल्याने तेलगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

Follow Us
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन!
प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
Praful Patel Met Sharad Pawar : प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ