
मुंबई : मल्याळम अभिनेत्री रेंजुषा मेनन ( Renjusha Menon Death ) सोमवारी सकाळी तिरुअनंतपुरममधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. 35 वर्षीय अभिनेत्रीने गळफास घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ती तिचा पती आणि अभिनेता मनोजसोबत त्या फ्लॅटमध्ये राहत होती. ती आर्थिक संकटातून जात असल्याचं बोललं जात आहे. आत्महत्येची प्राथमिक माहिती असली तरी तिच्या मृत्यूचा तपास पोलीस करत आहेत.
कोचीची राहणारी अभिनेत्री मंजुषाने टीव्ही मालिकांमध्ये येण्यापूर्वी टीव्ही शो अँकर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने ‘स्त्री’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर अभिनयाची सुरुवात केली.
टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमधील तिच्या सहाय्यक भूमिकांसाठी ती प्रसिद्ध होती. या भूमिकांमुळे ती घराघरात पोहोचली. ज्याने तिला लोकप्रियता मिळवून दिली. या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहेत.
गेल्या महिन्यात आणखी एक मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायर हिच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीला धक्का बसला होता. अपर्णा तिचा पती आणि मुलांसोबत राहत होती, असे पोलिसांनी सांगितले.