
झी मराठी वाहिनीवरील 'मन उडु उडु झालं' (Man Udu Udu Zhala) या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीन्सवर खिळवून ठेवलं आहे. ही मालिका सध्या एका विलक्षण वळणावर आली आहे.

प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत पाहिलं की शलाकाच्या सासरी तिच्यावर होणाऱ्या छळाबद्दल दिपूला कळतं आणि ती प्रचंड चिडते. रागाच्या भरात कानविंदे परिवाराला सुनवते.

दिपूला कानविंदे परिवाराचा खरा चेहरा कळल्यामुळे दिपू आणि शलाकाला संपवण्याचा प्रयत्न कानविंदे परिवार करतं. पण इंद्रा त्यांच्या मदतीला धावून येतो आणि शलाकावर केलेल्या अन्यायाविरुद्ध कानविंदे परिवाराला चांगलाच धडा शिकवतो.

धर्मवीर चौकात इंद्रा नयनला चांगलाच चोप देऊन त्याची धिंड काढतो. इंद्रा शलाकाला न्याय मिळवून देऊ शकेल का, इंद्रा आणि दिपू आता पुढे काय करणार, हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.

या मालिकेत अजिंक्य राऊत इंद्राच्या तर हृता दुर्गुळे ही दिपूच्या भूमिकेत आहे. अल्पवधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली.