AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Life | एक दोन नाहीतर, 12 सेलिब्रिटींसोबत मनिषा कोईरालाचे अफेअर, उद्योजकासोबत लग्न पण…

वयाच्या 53 व्या वर्षी मनिषा कोईराला जगतेय एकटीच... अभिनेत्रीला कधीच नाही मिळालं पुरुषाचं प्रेम.. आयुष्यात एक दोन नाही तर, 12 वेळा झाली प्रेमाची एन्ट्री, उद्योजकासोबत लग्न पण केलं, पण नाही टिकला संसार..., फार कमी लोकांना माहिती आहे अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल...

Love Life | एक दोन नाहीतर, 12 सेलिब्रिटींसोबत मनिषा कोईरालाचे अफेअर, उद्योजकासोबत लग्न पण...
| Updated on: Mar 16, 2024 | 2:56 PM
Share

मुंबई | 16 मार्च 2024 : अभिनेत्री मनिषा कोईराला हिने अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मोठ्या पडद्यावर अभिनेत्रीला यश देखील मिळालं, पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रीला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. एक काळ असा होता, जेव्हा मनिषा हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं, पण कोणासोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीने19 जून 2010 साली नेपाळचे उद्योगपती सम्राट दहालसोबत लग्न केलं. पण मनिषा हिचं नातं फार काळ टिकलं नाही.

2010 मध्ये मनिषा हिने मोठ्या थाटात सम्राट दहालसोबत लग्न केलं. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले. अशात सम्राट दहाल आणि मनिषा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर सम्राट आणि मनिषा यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अभिनेत्रीने एका मुलाखतीत ‘माझ्या आयुष्यात पुरुषाचं प्रेम नाही…’ असं म्हणत अपयशी ठरलेल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला होता.

एवढंच नाहीतर, अभिनेत्रीने पतीचा उल्लेख शत्रू म्हणून केला होता. घटस्फोटानंतर जेव्हा अभिनेत्रीने खासगी आयुष्याचा खुलासा केला, तेव्हा अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नाच्या सहा महिन्यांनंतर पतीच माझा शत्रू झाला. एका महिलेसाठी यापेक्षा वाईट काय असू शकतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

मनिषा कोईराला हिचे बॉयफ्रेंड्स

एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रीच्या नावाची चर्चा दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील झाली होती. पण नाना पाटेकर तेव्हा विवाहित होते. नाना पाटेकर यांच्याशिवाय मनिषाचं नाव विवेक मुशरान, डिजे हुसैन, सेसिल एंथनी , आर्यन वेद, प्रशांत चौधरी, क्रिस्पिन कॉनरॉय, तारिक प्रेमजी, राजीव मूलचंदानी क्रिस्टोफर डोरिस यांच्यासोबत जोडण्यात आलं.

मनिषा कोईराला हिचे सिनेमे

‘सौदागर’, ‘1942: ए लव स्टोरी’, ‘बॉम्बे’, ‘अग्नि साक्षी’, ‘गुप्त’ आणि ‘मन’ यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून मनिषा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री ‘संजू’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. सिनेमाने चाहत्यांचं मनोरंजन देखील केलं. आता अभिनेत्री ‘हिरा मंडी’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.