
Shah Rukh Khan Property: अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अनेक हीट सिनेमे देत अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. आज किंग खान कुटुंबासोबत आलिशान आयुष्य जगत आहे. शाहरुख याचे फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील गडगंड संपत्ती आहे. मुंबईत ‘जन्नत’ तर, अभिनेत्याचा दुबईत ‘जन्नत’ बंगला आहे. तर आज शाहरुख खान याच्या संपत्तीबद्दल जाणून घेवू…
मन्नत : अभिनेता शाहरुख खानचा समुद्रासमोरील बंगला, मन्नत, हा सहा मजली पांढरा बंगला आहे. प्रचंड आलिशान असा हा बंगला आहे. अरबी समुद्राचं एक विलक्षण दृश्य दिसतं. व्होगच्या मते, खान कुटुंब 2001 मध्ये या घरात राहायला आलं. रिपोर्टनुसार, आजची ‘मन्नत’ बंगल्याची किंमत 200 कोटींपेक्षा अधी आहे.
अलिबाग हॉलीडे होम : शाहरुख खान त्याच्या अलिबागमधील सुट्टीच्या घरी त्याच्या जवळच्या मित्रांसोबत वाढदिवस आणि न्यू-ईयर साजरा करतो. शाहरुख खानच्या अलिबाग येथील घरात एक स्विमिंग पूल, अनेक खुले डेक आणि एक खाजगी हेलिपॅड आहे. शाहरुख खानच्या प्रॉपर्टीची किंमत 14.67 कोटी रुपये आहे.
शाहरुख खानचं दिल्लीतील घर – दिल्लीमध्ये शाहरुख खान याचं स्वतःचं घर आहे. अभिनेत्याचं बालपण दिल्लीत गेलं. किंग खान याच्या दिल्लीतील घराला अभिनेत्रीने चांगल्या प्रकारे सजवलं आहे. खान कुटुंबातील अनेक आठवणी घरासोबत जोडलेल्या आहेत.
लंडन येथील घर: शाहरुखकडे लंडनमध्ये 175 कोटी रुपयांचं आलिशान अपार्टमेंट आणि लॉस एंजेलिसमध्ये एक आलिशान मघर आहे, ज्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय रिअल इस्टेट साम्राज्यात भर पडली आहे. शाहरुख खान कायम त्याच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी लंडन येथे जात असतो.
शाहरुख खानचं दुबईतील घर : दुबईतील पाम जुमेराह येथे अभिनेत्याचा व्हिला देखील आहे, ही एक आलिशान मालमत्ता आहे. या व्हिलामध्ये सहा बेडरूम, दोन रिमोट-कंट्रोल्ड गॅरेज आणि एक खाजगी स्विमिंग पूल आहे. या व्हिलाची किंमत 100 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.