पाकिस्तान जिंदा भाग…, भारत – पाकिस्तानमध्ये तणावदरम्यान प्रसिद्ध लेखाकाचं ट्विट चर्चेत

Operation Sindoor: भारत - पाकिस्तान तणावादरम्यान प्रसिद्ध लेखकाचं ट्विट चर्चेत, 'पाकिस्तान जिंदा भाद...' म्हणत भारतीय सेनेबद्दल म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त लेखकाच्या वक्तव्याची चर्चा...

पाकिस्तान जिंदा भाग..., भारत - पाकिस्तानमध्ये तणावदरम्यान प्रसिद्ध लेखाकाचं ट्विट चर्चेत
Operation Sindoor
| Updated on: May 13, 2025 | 8:30 AM

Operation Sindoor: भारत – पाकिस्तान या दोन देशांमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तणवाचं वातावरण आहे. 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर या दहशतवादी हल्ल्याला सडोतोड उत्तर देत भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आला आणि भारतीय जवानांनी 9 दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केलं. अशात भारतीय सैन्याने शत्रूंचे सर्व प्रयत्न मोडून काढले.

भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात केलेल्या कारवाईनंतर प्रत्येक भारतीय भारतीय सेनेचं कौतुक करताना दिसत आहे. प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशिर याने देखील भारतीय सेनेचं कौतुक त्याच्या खास अंदाजात केलं आहे.

 

 

मनोज म्हणाला, ‘भारतीय सैन्याचं शौर्य पाहून ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे नारे देणारे आता म्हणत असतील ‘पाकिस्तान जिंदा भाग…’ भारतीय सैन्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक… भित्र्या शेजाऱ्यांनो बघा भारतीय सिंदूरमध्ये पाकिस्तानी रक्तापेक्षा जास्त लोह आहे… जय हिंद… जय हिंद की सेना…’ अशी पोस्ट लेखकाने केली आहे.

भारत – पाकिस्तान तणाव

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या हल्ल्यात जवळपास 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. पण यानंतर देखील पाकिस्तान शांत बसला नाही. पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात झाली. पण यामध्ये देखील पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पाकिस्तानचे अनेक एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले.

भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला मोठा फटका देखील बसला आहे. पाकिस्तान पूर्णपणे कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानवर सध्या स्थितीमध्ये तब्बल 30 बिलियन डॉलरचं कर्ज आहे. जे सध्यातरी पाकिस्तानसाठी फेडणं कठीण आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पाकिस्तान – भारताची तणावाची चर्चा सुरु आहे.