Nana Patekar: नाना पाटेकरांनी मला 6 महिने तंगवलं अन् मग शेवटी..; गिरीश कुलकर्णी स्पष्टच बोलले

Nana Patekar: नाना पाटकेरांना मराठी चित्रपटांत काम करण्यासाठी तब्बल सहा महिने मनवावं लागले, असं आता मराठी अभिनेत्याने बोलून दाखवले आहे.

Nana Patekar: नाना पाटेकरांनी मला 6 महिने तंगवलं अन् मग शेवटी..; गिरीश कुलकर्णी स्पष्टच बोलले
| Updated on: Oct 29, 2026 | 1:21 PM

Girish Kulkarni On Nana Patekar: नाना पाटेकरांबरोबर काम करण्याची संधी मिळणं ही हे अनेक कलाकारांचे स्वप्न असते. अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनासुद्धा त्यांच्याबरोबर काम करायचे होते आणि त्यांनी ते केलेही. परंतु, यासाठी नाना पाटेकरांना मनवणं हे काही सोपं काम नव्हतं. नुकतंच गिरीश कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांबरोबर काम करण्यापूर्वीचा किस्सा बोलून दाखवला आहे.

गिरीश कुलकर्णी व नाना पाटेकर यांनी ‘देऊळ’ या चित्रपटात एकत्र काम केलंय. २०११ साली आलेल्या या मराठी चित्रपटात नाना पाटेकरांनी भाऊ गेलांडे तर गिरीश कुलकर्णी यांनी केश्या ही भूमिका साकारलेली.आता गिरीश कुलकर्णी यांनी या चित्रपटासाठी त्यांनी नाना पाटेकर यांना कसं मनवलं होतं, तेव्हा किती त्रास झाला होता याबद्दल सांगितले आहे. इसापनितीला दिलेल्या मुलाखतीत गिरीश कुलकर्णी यांनी हे बोलून दाखवले आहे.

Loading...

‘देऊळ’ या चित्रपटासाठी नाना पाटेकर यांचा होकार कसा मिळवला याबद्दल गिरीश कुलकर्णी म्हणाले, “माझा अट्टाहास होता की माझ्या पहिल्या चित्रपटात नाना असावेत. त्यामुळे वळूच्या वेळीच खूप प्रयत्न केला होता, पण त्यांनी नकार दिलेला. मी पण खूप ताठ्यात होतो. ते मला म्हणाले तू घरी येऊन संहिता ठेव मी म्हटलं नाही मी वाचून दाखवणार. ते म्हणाले जा घरी. असं ते सगळं होतं पण मग नंतर मला चूक उमगली. देऊळसाठी मात्र मला तेच हवे होतं. अट्टाहास होता. सहा महिने जवळजवळ तंगवलं त्यांनी. मी पण ठाम होतो की नानाच पाहिजे आणि मग ते झालं शक्य. सहा महिने आधी त्यांनी तंगवले आणि मग शेवटी हो म्हणाले.”

याच मुलाखतीत नाना पाटेकरांचं कौतुक करताना गिरीश कुलकर्णी म्हणाले, “मी त्यांचे नाटकही पाहिलेत. तेव्हा मी कोणीच नव्हतो. माझ्याकडे पैसे नसतानाही मी पुरुषचा प्रत्येक प्रयोग पाहिला आहे. सिनेमे तर खूप पाहिलेत मी.” दरम्यान, २०११ साली आलेल्या उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘देऊळ’ या चित्रपटातीत नाना पाटेकर, गिरीश कुलकर्णी यांच्यासह सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे हे कलाकारही झळकले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us