आदेश बांदेकरांनंतर प्रसाद ओकच्या लेकाचा धुमधडाक्यात पार पडला साखरपुडा, कोण आहे होणारी सून?

सध्या सोशल मीडियावर प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांच्या लेकाच्या साखरपुड्याची चर्चा सुरु आहे. त्याचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. आता प्रसाद ओकची होणारी सून कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आदेश बांदेकरांनंतर प्रसाद ओकच्या लेकाचा धुमधडाक्यात पार पडला साखरपुडा, कोण आहे होणारी सून?
Prasad Oak Son
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 20, 2026 | 11:55 AM

गेल्या काही दिवसांपासून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर लग्नबंधानत अडकला. त्याने अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्न केले. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचा लेक सार्थकचा साखरपुडा झाला आहे. सार्थक कोणाशी लग्न करत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी या साखरपुड्याला हजेरी लावली. त्यांचे फोटो समोर आले आहेत.

मोठा लेकाचा पार पडला साखरपुडा

अभिनेता प्रसाद ओकेचा लेक सार्थकचा काल, 19 जानेवारी रोजी साखरपुडा पार पडला. सार्थक ओक हा रितूशी लग्न करत आहेत. साखरपुड्याला सार्थकने फिकट पिस्ता रंगाची हाफ शेरवानी घातली आहे. त्यावर खाली पांढऱ्या रंगाची पँट घातली आहे. तर सार्थकची होणारी पत्नी रितूने फिकट गुलाबी रंगाचा घागरा घातला आहे. दोघेही या कपड्यांमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. तर दुसरीकडे प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरीने लेकाच्या साखरपुड्यासाठी मॅचिंग कपडे घातले आहेत.

कोण आहे रितू?

मंजरी ओकने फिकट हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर सुंदर अशी ज्वेलरी परिधान केली आहे. केसात गजरा, कपाळी टिकली, गळ्यात मंगळसूत्र अशा लूकमध्ये मंजीरी अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. तर प्रसाद ओकने मंजिरीच्या कपड्यांना मॅचिंग शेरवारी घातली आहे. तसेच त्यावर जॅकेट घातले आहे. खाली पांढऱ्या रंगाची पँट घातली आहे. तर रितूच्या आई-वडिलांनी रितूला मॅचिंग असे गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

लग्न कधी होणार?

सार्थकच्या साखरपुड्याला मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. त्यामध्ये प्रसाद ओकची जवळची मैत्रिणी अमृता खानविलकरचा सहभाग आहे. अमृता खानविलकर आईसोबत प्रसादच्या लेकाच्या साखरपुड्याला पोहोचली होती. तसेच अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेता समीर चौघुले देखील हजर होता. आता सार्थकचे लग्न कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.