सयाजी शिंदे यांचा मुलगा वयाच्या 21 व्या वर्षी करतो तरी काय? दिसतो तर प्रचंड हँडसम…
'वर्षभर तर मला माहितीच नव्हतं की तो काय करतोय, पण...', सयाजी शिंदे यांचा मुलगा वयाच्या 21 व्य वर्षी नेमकं करतो तरी काय? अभिनेते मुलाबद्दल स्वतःचं म्हणाले..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सयाजी शिंदे यांच्या मुलाचीच चर्चा...

अभिनेता सयाजी शिंदे यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. वृक्षप्रेमी, अभिनय प्रेमी, कोणत्याही मुद्यावर स्वतःचं ठाम आणि परखड मत मांडणारे सयाजी शिंदे यांनी फक्त मराठी सिनेविश्वातच नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्व आणि हिंदी सिनेविश्व देखील गाजवलं आहे. सयाजी शिंदे यांच्याबद्दल आणि त्यांच्या सिनेमांबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या मुलाबद्दल फार कोणाला काहीच महिती नाही. अशात नुकताच झालेल्या एक मुलाखतीत सयाजी शिंदे यांनी मुलाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहे. वयाच्या 21 व्या वर्षी सयाजी शिंदे यांच्या मुलाने वडिलांच्या ओळखीचा फायदा न घेता स्वतःच्या मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे. यावर सयाजी शिंदे म्हणाले, ‘तो एक वर्ष काय करत होता, हे देखील मला माहिती नव्हतं…’, सांगायचं झालं तर, सयाजी शिंदे यांच्या मुलाचं नाव सिद्धार्थ शिंदे असं आहे आणि सिद्धार्थ देखील सिनेविश्वात सक्रिय झाला आहे.
सयाजी शिंदे यांच्या मुलाने वयाच्या 21 व्या वर्षी सिनेविश्वात पहिलं पाऊल टाकलं आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत, सयाजी शिंदे यांनी त्यांच्या घराची सफर दाखवत, पुस्तकांचं कलेक्शन दाखवलं. त्यानंतर तुमच्या मुलाला देखील पुस्तकांची आवड आहे का? असं विचारण्यात आलं, यावर शिंदे म्हणाले, ‘त्यालाही वाचनाची आणि पुस्तकांची प्रचंड आवड आहे. सिद्धार्थ आता 21 वर्षांचा झाला आहे आणि त्याने स्वतःची पहिली शॉर्टफिल्म लिहिली आहे. त्याने शॉर्टफिल्म फक्त लिहिली नाही तर, त्याने दिग्दर्शन आणि अभिनय देखील केलं आहे.’
‘शॉर्टफिल्मसाठी त्याने जो विषय निवडला आहे, तो विचारपूर्वक आणि संपूर्ण अभ्यास करुन निवडला आहे. असं मला मनापासून वाटतं.’ दोघांमध्ये रंगत असलेल्या गप्पांबद्दल देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘आम्ही सिनेमाची चर्चा करण्यासाठी कधीच ठरवून बसत नाही. सहज गप्पा रंगल्यानंतर सिनेमाचा विषय निघतो…’
‘सिद्धार्थ वर्षभर काय करत होता मला काहीच माहिती नव्हतं. एक दिवस तो स्वतःच माझ्यासोबत सिनेमांबद्दल विचारण्यासाठी आला आणि गंभीरपणे बोलू लागला. तेव्हा मला त्याच्या कामाची खरी ओळख पटली. तो माझ्यासोबत जे काही बोलतो, ते मी माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड करुन ठेवतो…’
पुढे सयाजी शिंदे म्हणाले, ‘त्याने माझ्या नावाचा किंवा ओळखीचा कोणताही उपयोग न करता 15 – 20 मुलांची एक टीम तयार केली आहे आणि दिग्दर्शक करत अभिनय देखील केला… त्याची ही शॉर्टफिल्म लवकरच यूट्यूबवर प्रदर्शित होणार आहे.’, सांगायचं झालं तर, सिद्धर्थ शिंदे सोशल मीडियावर कामय सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.