हे राजकीय स्टंट, लोकांना भडकवायचं…रिक्षा-टॅक्सी चालकांच्या ‘मराठी भाषा सक्ती’वर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं परखड मत

Marathi Actor On Marathi Language Compulsion : मराठी अभिनेते विद्याधर जोशी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी भाषा सक्तीवर त्यांचं मत मांडलं आहे.

हे राजकीय स्टंट, लोकांना भडकवायचं...रिक्षा-टॅक्सी चालकांच्या ‘मराठी भाषा सक्ती’वर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं परखड मत
| Updated on: Oct 06, 2026 | 8:48 PM

महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. या निर्णयावर अनेक स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असताना ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्याला आपला विरोध नसल्याचं सांगत, मात्र मराठी बोलण्याची सक्ती करण्यामागे राजकीय हेतू असल्याचं विद्याधर जोशींनी म्हटलं आहे.

 

Loading...

विद्याधर जोशी यांचं मत

विद्याधर जोशी म्हणाले की, ‘टॅक्सीवाल्यांना मराठी यायलाच पाहिजे, हो यावं, माझी काही हरकत नाही. मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापकांना मराठी यायला पाहिजे. पण, त्यांच्याकडे जाणारे कितीजण मराठीत बोलतात? मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा मोठ्या पदांवरच्या लोकांना भेटायला जाणारे मराठी लोक सुरुवातीला कितीवेळा मराठीत बोलतात? नाही बोलत.’

‘आता मी माझ्या बाबतीत सांगतो, मी असं ठरवलंय की, मी जेव्हा रिक्षा-टॅक्सीत बसतो, तेव्हा मी त्याला सांगतो, ’अरे बाबा मला अंधेरीला जायचंय’. तो मला ‘आ…’ करून म्हणाला की, मला समजतं, त्याला समजलेलं नाहीये. तेव्हा मग मी म्हणतो, ‘अंधेरी जाना है.’ आता त्या रिक्षावाल्याला मराठी येतं की, नाही याच्याशी मला फार काही देणंघेणं नाहीये, हे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो. कारण, हे राजकीय स्टंट आहेत, असं माझं मत आहे. तुमच्याकडे फारसे काही मुद्दे नाहीत, म्हणून मग या मुद्द्यांवर तुम्ही लोकांना जास्त भडकवायचं किंवा त्यांना आकर्षित करायचं. आता त्यांना मराठी शिकवायला काहीच हरकत नाही. चार वाक्य असतात ती, त्यांना समजून सांगा. पण, त्यांनी मराठीत बोलावं यासाठी मी फारसा आग्रही नाही.’ असं विद्याधर जोशी शेवटी म्हणाले. ‘आरपार‘ला दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशी बोलत होते.

 

दरम्यान, विद्याधर जोशी त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यापूर्वीही ‘कलावंत‘ ढोल ताशा पथकाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे विद्याधर जोशी चर्चेत आलेले. विद्याधर जोशी सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us