AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फॉरेन रिटर्न अँड वेल सेटल’चा मुहूर्त, पराग भावसार टच या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती

पराग भावसार टच या बॅनरखाली निर्माते पराग भावसार 'फॉरेन रिटर्न अँड वेल सेटल' या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अंधेरी येथील पंचम स्टुडिओमध्ये निर्माते-दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आणि गायकांच्या प्रमुख उपस्थितीत 'फॉरेन रिटर्न अँड वेल सेटल'चा मुहूर्त करण्यात आला. ('Foreign Return and Well Settle', Produced by Parag Bhavsar Touch)

'फॉरेन रिटर्न अँड वेल सेटल'चा मुहूर्त, पराग भावसार टच या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 11:21 AM
Share

मुंबई : मराठी सिनेसृष्टी (Marathi Movies) पुन्हा एकदा नव्या जोमानं गरुडभरारी घेण्यासाठी सज्ज झाल्याचं चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. एकीकडे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा घोषित होत असल्यानं लवकरच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत, तर दुसरीकडे नवीन चित्रपटांचे मुहूर्तही दिमाखदार शैलीत संपन्न होत असल्यानं चित्रपटसृष्टीत नवचैतन्य पसरल्याची जाणीव होत आहे. नुकताच ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. गीत ध्वनीमुद्रणानं ‘फॉरेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.

पराग भावसार टच बॅनरखाली ‘फॉरेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटाची निर्मिती 

पराग भावसार टच या बॅनरखाली निर्माते पराग भावसार ‘फॉरेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अंधेरी येथील पंचम स्टुडिओमध्ये निर्माते-दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आणि गायकांच्या प्रमुख उपस्थितीत ‘फॉरेन रिटर्न अँड वेल सेटल’चा मुहूर्त करण्यात आला. यावेळी ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ हे टायटल साँग रेकॅार्ड करण्यात आलं. गीतकार श्रीकृष्ण राऊत यांनी लिहिलेलं हे टायटल ट्रॅक वैशाली माडेनं आपल्या सुमधूर आवाजात गायलं आहे. संगीतकार दिनेश अर्जुना यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक पराग भावसार आहेत. प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक भावसार एक सशक्त मेसेजही देण्याचा प्रयत्न करणार आहेत. ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या शीर्षकावरून ही लव्हस्टोरी एका वेगळ्याच पातळीवरील सत्य उलगडणारी असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘प्रेक्षकांचंही लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होईल असा विश्वास’

लव्हस्टोरी असल्यानं हा चित्रपट तरुणाईला खुणावेल, पण त्यासोबत इतर वयोगटातील प्रेक्षकांचंही लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करत भावसार म्हणाले की, लव्हस्टोरी हा रसिकांचा आवडता विषय असल्यानं आजवर बऱ्याच प्रेमकथा चित्रपट रूपात समोर आल्या आहेत. या चित्रपटात मात्र यापूर्वी कधीही न पाहिलेलं प्रेम आणि त्या प्रेमाची अनोखी गुलाबी कथा असेल याची खात्री बाळगा. अनोख्या शैलीत खुलत जाणाऱ्या या गुलाबी लव्हस्टोरीला तितक्याच सुमधूर संगीताची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या टायटल ट्रॅकनं या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आल्यानंतर पुढे जबाबदारी खूप वाढली आहे. या चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांसमोर एक दर्जेदार कलाकृती सादर करण्याचा आमच्या सर्व टीमचा प्रयत्न असल्याचंही भावसार म्हणाले. या चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. प्रसिद्ध डिओपी महेश आणे यांच्या नजरेतून ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ हा चित्रपट पहायला मिळणार आहे. राहुल भातणकर या चित्रपटाचा संकलक असून, कोरिओग्राफी प्राण हंबर्डे करत आहे. कथानकाला साजेशा कलाकारांची निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. कलाकार फायनल झाल्यावर लगेचच शूटिंगला सुरुवात करण्याची योजना आखण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Sophie Choudry : समुद्रकिनारी बिकिनी परिधान करून सोफी चौधरीने दाखवला बोल्ड अवतार, पाहा क्लासी फोटो

Apurva Nemlekar : नवरात्रीचा चौथा दिवस; नारंगी रंग आणि जया जगदंबा मातेचा लूक, पाहा अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा खास अंदाज

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.