AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ठेच’ प्रेमाच्या आयुष्याला लागलेली खूणगाठ, चित्रपटाचा टीझर लाँच , चित्रपट 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमाचा त्रिकोण ही संकल्पना अजरामर आहे. "ठेच" या चित्रपटात प्रेमत्रिकोणाचीच गोष्ट मांडण्यात आली आहे. कॉलेजमधून आवेगानं धावणारी मुलगी टीजरमध्ये दिसत आहे.

'ठेच' प्रेमाच्या आयुष्याला लागलेली खूणगाठ, चित्रपटाचा टीझर लाँच , चित्रपट 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला
ठेच सिनेमाImage Credit source: TV9
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 18, 2022 | 8:30 AM
Share

मुंबई : पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी एक म्हण मराठीत आहे. आयुष्याचा प्रवास ठेचा खाऊनच होतो. काहीवेळा प्रेमातही ठेच खावी लागते. कॉलेज जीवनातील प्रेमात खाल्लेली ‘ठेच’ (thech movie) आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार असून, 15 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन (Nrusinha Film Production) प्रस्तुत ठेच या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सय्यद मोईन सय्यद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

आई वडील नसलेला शिवा मामाच्या इथे राहून आपल दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो. तिथे त्याची मैत्री त्याची वर्ग मैत्रीण शामबालाशी होते. शामबालाची मैत्रीण पल्लवी ही शिवाला खूप आवडते. तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्नं रंगवत असतो. पण शामबाला शिवाच्या प्रेमात पडते. शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबालाकडे पल्लावीला प्रपोज करतो. पण हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचं हे प्लॅन करत असते. पण शिवाने पल्लवीला मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्नासाठी केलेला रोमांचक प्रवास ठेच या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

कॉलेज जीवनातील प्रेमात खाल्लेली ‘ठेच’ आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार असून, 15 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे.  प्रेमाचा त्रिकोण ही संकल्पना अजरामर आहे. “ठेच” या चित्रपटात प्रेमत्रिकोणाचीच गोष्ट मांडण्यात आली आहे. कॉलेजमधून आवेगानं धावणारी मुलगी टीजरमध्ये दिसत आहे. फ्रेश लुक, लक्षवेधी संगीत आणि चित्रीकरणाची जोड मिळाली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार