‘मला आजही मनासारखे चित्रपट मिळतात’, अभिनेत्री निशिगंध वाड यांनी व्यक्त केला आनंद!

| Updated on: Aug 05, 2021 | 2:02 PM

ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड (Nishigandha Wad) या त्यांच्या’ 'एक पेक्षा एक', 'प्रतिकार', 'प्रेमांकुर', 'सासर माहेर' आणि इतर अनेक मराठी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.

‘मला आजही मनासारखे चित्रपट मिळतात’, अभिनेत्री निशिगंध वाड यांनी व्यक्त केला आनंद!
निशिगंधा वाड
Follow us on

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड (Nishigandha Wad) या त्यांच्या’ ‘एक पेक्षा एक’, ‘प्रतिकार’, ‘प्रेमांकुर’, ‘सासर माहेर’ आणि इतर अनेक मराठी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. ‘शेजारी शेजारी’ फेम या अभिनेत्रीने सतीश महादू फुगे दिग्दर्शित ‘बॅक टू स्कूल’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण केले आहे.

ई टाइम्स केलेल्या खास संभाषणात निशिगंध वाड म्हणाल्या की, ‘हा चित्रपट त्या प्रवासावर आधारित आहे, जो सध्याच्या परिस्थितीमध्ये जिथे मराठी शाळा बंद पडत आहेत, त्यावर भाष्य करतो. हा चित्रपट अतिशय दमदार आणि उत्साहवर्धक आहे. हा शिक्षकांचा एक संघर्ष आहे ज्याला त्यांच्या विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे”.

मराठी भाषेला आदरणीय स्थान असावे!

पुढे त्या म्हणाल्या की, “ही एक अद्भुत कथा आहे, अगदी समकालीन आहे आणि खरोखर लोकांच्या हृदयात घर करेल. महाराष्ट्र राज्यात, मराठी शाळा टिकणे आवश्यक आहे. मातृभाषेला स्वतःचे आदरणीय स्थान असणे आवश्यक आहे.”

या प्रवासाबद्दलचा आपला अनुभव सांगताना निशिगंधा वाड म्हणाल्या, “नम्रपणे सांगायचे तर, मला ज्या भूमिका करायला आवडतात त्याच मी साकारत आहे. हे चित्रपट मला जे करायला आवडतं, ते दाखवण्यास मदत करत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आशयाचा विस्तृत स्पेक्ट्रम संबंध आहे, ते खूप प्रामाणिक आहेत. बहुतांश चित्रपट पडद्यावर दाखवण्यासारखे आशय घेऊन येतात. जागतिक परिस्थितीच्या तुलनेत मराठी सिनेमाच्या व्यावसायिक फायद्यासाठी तडजोड तुलनेने कमी आहे.”

मी आभारी आभारी आहे!

“खरोखरच माझ्यावर देवाची खूप कृपा आहे, मला जे आवडते तेच मी करत आहे. मला चांगले प्रोजेक्ट दिले जात आहेत, याचा मला आनंद आहे आणि परमेश्वराच्या कृपेने चांगली कामे माझ्या वाट्याला आली याबद्दल मी कृतज्ञ आहे.”

चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘बॅक टू स्कूल’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आता हा चित्रपट सज्ज झाला आहे. सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण-विश्वासराव, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी आणि ईशा आगरवाल आदी कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी केले आहे.

हेही वाचा :

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितचा स्वॅग पाहिलात?, नव्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

शाहरुख खान ते अक्षय कुमारपर्यंत, बॉलिवूडकरांनी भारतीय हॉकी संघावर केला शुभेच्छांचा वर्षाव!