AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Romantic Song : केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे म्हणतायत ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’

जोडी ही नेहमीच चिकनी दिसते आणि अशीच प्रेमळ, म्युझिकल जोडी ज्याने महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांची त्यांच्या आवाजाने मने जिंकली आहेत, तसेच मनातल्या भावनांना मोकळी वाट करुन देणा-या त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी नेहमीच मनापासून दाद दिली आहे अशी सर्वांची हक्काची जोडी म्हणजे गायक केवल वाळंज आणि गायिका सोनाली सोनावणे. (Romantic song 'Jodi Doghanchi Distey Chikni' is out now)

Romantic Song : केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे म्हणतायत ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 12:38 PM
Share

मुंबई : प्रेम ही अशी भावना आहे ज्याविषयी व्यक्त होताना शब्द अपुरे पडतात आणि नवल म्हणजे प्रेम (Love) व्यक्त करताना अनेक शब्दांची गुंफण देखील घातली जाते (Romantic Song). बोलू आणि व्यक्त होऊ तितके कमीच आणि न बोलताही व्यक्त होते ते म्हणजे प्रेम. आपल्या मराठी संगीत आणि मनोरंजन क्षेत्रात अनेक प्रेमाची, रोमँटिक अशी गाणी आली आहेत. त्यामुळे आता दोन जोडींना प्रेम व्यक्त करणं सोप्पं झालं आहे. आता या रोमँटिक गाण्यांच्या यादीत नव्याने भर पडणार आहे कारण ‘सप्तसूर म्युझिक’ आणि ‘फिल्मी आऊल स्टुडियोज्’ प्रस्तुत, साईनाथ राजाध्यक्ष निर्मित आणि बीना राजाध्यक्ष सहनिर्मित ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’ या रोमँटिक कोळीगीताचा ऑडिओ ट्रॅक नुकताच प्रदर्शित झाला आहे.

मनातल्या भावनांना मोकळी वाट करुन देणारं गाणं, ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’

जोडी ही नेहमीच चिकनी दिसते आणि अशीच प्रेमळ, म्युझिकल जोडी ज्याने महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांची त्यांच्या आवाजाने मने जिंकली आहेत, तसेच मनातल्या भावनांना मोकळी वाट करुन देणा-या त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी नेहमीच मनापासून दाद दिली आहे अशी सर्वांची हक्काची जोडी म्हणजे गायक केवल वाळंज आणि गायिका सोनाली सोनावणे.

पाहा गाण्याची झलक

‘जोडी दोघांची दिसते चिकनी’ हे रोमँटिक गाणं केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे यांनी गायले आहे आणि गाण्यातला प्रेमळपणा आणि गोडवा त्यांच्यामुळे वाढला आहे. तसेच अमेय मुळ्ये हे या गाण्याचे म्युझिक कंपोझर आहेत तर या गाण्याचे शब्द राजेंद्र वैद्य कल्याणकर यांनी लिहिले आहेत. आशिष गमरे यांनी म्युझिक अरेंजर- प्रोग्रामर म्हणून काम पाहिले आहे. म्युझिक टीममधील विजय शिवलकर, अमोघ दांडेकर, आशिष, राहुल, संदेश, प्रियांका, स्वरा आणि पूजा, कार्यकारी निर्माते अंकित शिंदे आणि दिव्या घाग, सिनेमॅटोग्राफर प्रकाश विरकर या सर्वांचा देखील या गाण्यात महत्त्वाचा सहभाग आहे. केवल आणि सोनाली यांच्या गाण्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात आणि आता नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर त्यांचं ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे, ज्याचा आनंद प्रेक्षकवर्ग नक्की लुटणार असा विश्वास वाटतो.

संबंधित बातम्या

Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनीच्या किलर अदा, पाहा नव्या फोटोशूटचे क्लासी फोटो

Sophie Choudry : समुद्रकिनारी बिकिनी परिधान करून सोफी चौधरीने दाखवला बोल्ड अवतार, पाहा क्लासी फोटो

Apurva Nemlekar : नवरात्रीचा चौथा दिवस; नारंगी रंग आणि जया जगदंबा मातेचा लूक, पाहा अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा खास अंदाज

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.