मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल…; ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर

Ye Re Ye Re Paisa 3 Movie Realese in Diwali : दिवाळीच्या मुहूर्तावर 'ये रे ये रे पैसा' ची पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालं आहे. पुन्हा एकदा मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल...; 'ये रे ये रे पैसा' पुन्हा बॉक्स ऑफिसवर
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 6:03 PM

संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मॅड कॉमेडी असलेला ‘ये रे ये रे पैसा 2’ या नावानं आलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेललाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. संजय जाधव पुन्हा एकदा ‘ये रे ये रे पैसा 3’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. येत्या दिवाळीमध्ये 1 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं आहे.

कधी होणार चित्रपट प्रदर्शित?

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘ये रे ये रे पैसा’ ची पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडणार आहे. पुन्हा एकदा मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित ये रे ये रे पैसा 3 चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालं आहे.

चित्रपटाची स्टारकास्ट

अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थांचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, कुमार मंगत पाठक, ओमप्रकाश भट्ट, नासिर शरीफ यांनी “ये रे ये रे पैसा ३” या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर निनाद नंदकुमार बत्तीन सहनिर्माते आहेत.

चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. चित्रपटाची पटकथा संजय जाधव यांची आहे. तर या चित्रपटाचं संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे. चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ या पूर्वीच्या दोन्ही चित्रपटात पाहायला मिळाले होते. या दोन्ही चित्रपटांचा प्रेक्षकांची तुफान प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता ‘ये रे ये रे पैसा 3’ मध्ये आणखी काय वेगळी कथा दाखवली जाणार याची उत्सुकता आहे. उत्तम अभिनेते या चित्रपटात असल्यानं हा चित्रपट प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत ‘ये रे ये रे पैसा 3’ हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.