AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 20: लज्जास्पद, मेरी कोम यांच्यावर भडकले नेटकरी; मनोज तिवारी यांच्या मुलीबद्दल अशी टिप्पणी

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरात मेरी कोमने रीती तिवारीबद्दल असं काही म्हटलंय, ज्यावरून सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. अनेकांनी मेरी कोम यांच्यावर टीका केली आहे.

Bigg Boss 20: लज्जास्पद, मेरी कोम यांच्यावर भडकले नेटकरी; मनोज तिवारी यांच्या मुलीबद्दल अशी टिप्पणी
मेरी कोम, मनोज तिवारी-रिती तिवारीImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 11, 2026 | 10:47 AM
Share

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’च्या घरात पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमधील वाद चांगलाच रंगताना दिसत आहे. यावेळी ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर मेरी कोम आणि रीती तिवारी यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. किचनमधील कामावरून सुरू झालेल्या या वादाला नंतर वैयक्तिक वळण मिळालं. विशेष म्हणजे, मेरी कोम यांनी रीतीला तिच्या शरीरयष्टीवरून केलेल्या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर काही प्रेक्षक नाराज झाले आहेत. बिग बॉसच्या घरात प्रत्येक सदस्याला वेगवेगळ्या कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. किचनमधील कामादरम्यान मेरी कोम यांनी रीती तिवारीला काही कामाबाबत विचारणा केली. त्यावेळी रीती इतरांसाठी चहा बनवत असल्याचं सांगत होती. याच मुद्द्यावरून दोघींमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.

रीतीने तिची जबाबदारी आपल्याला माहिती असल्याचं स्पष्ट केलं. तसंच तिच्याबद्दल तिच्या पाठीमागे चर्चा करू नये, असंही तिने मेरी कोम यांना सांगितलं. यानंतर वातावरण आणखी तापलं. प्रोमो आणि एपिसोडमध्ये दोघींमधील संभाषणाचा सूर चांगलाच तीव्र झालेला पाहायला मिळाला.

‘मोटी’ म्हणाल्याने मेरी कोम वादात

या वादादरम्यान मेरी कोम यांनी रीती तिवारीला तिच्या शरीरयष्टीवरून ‘मोटी’ असा उल्लेख केल्याचं समोर आलं. यानंतर काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. मेरी कोम यांच्याकडून अशा प्रकारची टिप्पणी अपेक्षित नसल्याचं काही युजर्सनी म्हटलं आहे. शरीरयष्टीवरून एखाद्याला टिप्पणी करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. मेरी कोम या जागतिक स्तरावरील प्रसिद्ध बॉक्सर असून त्यांची ओळख त्यांच्या शिस्तप्रिय आणि मजबूत व्यक्तिमत्त्वासाठी आहे. बिग बॉसच्या घरातही आपण शिस्तीला महत्त्व देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे या घटनेनंतर त्यांच्या चाहत्यांमध्येही या वादाची चर्चा सुरू झाली आहे.

पहा व्हिडीओ-

रीतीने दिलं संयमी उत्तर

दुसरीकडे रीती तिवारीने या वादाला उत्तर देताना मेरी कोम यांच्याबद्दल आदर असल्याचं सांगितलं. मात्र, स्वत:बद्दल वैयक्तिक टिप्पणी सहन करणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं. अखेर दोघींनी एकमेकींना मिठी मारून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

रीती तिवारी ही अभिनेता आणि गायक मनोज तिवारी यांची मुलगी आहे. बिग बॉसच्या घरात आल्यानंतर तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अलीकडेच तिने प्रसिद्ध वडिलांची मुलगी असल्यामुळे येणाऱ्या दबावाबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केलं. तिला सोशल मीडियावर धमक्यांचा सामना करावा लागत असल्याचंही तिने सांगितलं.

Follow Us
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी