मायकल जॅक्सन यांच्या पत्नीचं निधन; चार लग्नांमुळे गायिका चर्चेत

मायकल जॅक्सन यांच्यासोबत दुसरं लग्न करणाऱ्या प्रसिद्ध गायिकेचं निधन; वयाच्या ५४ वर्षी घेतला अखेरचा श्वास

मायकल जॅक्सन यांच्या पत्नीचं निधन; चार लग्नांमुळे गायिका चर्चेत
मायकल जॅक्सन यांच्या पत्नीचं निधन; चार लग्नांमुळे गायिका चर्चेत
| Updated on: Jan 13, 2023 | 11:02 AM

Lisa Marie Presley: प्रसिद्ध अमेरिकन गायक, सॉन्गरायटर लिसा मॅरी प्रेस्ली (lisa marie presley) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडियारिपोर्टनुसार, गुरुवारी लिया यांना हृदय विकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान लिसा मॅरी प्रेस्ली यांचं निधन झालं आहे. लिसा मॅरी प्रेस्ली दिवंगत अमेरिकन अभिनेते, गायक आणि म्यूझिशीयन एल्विस प्रेस्ली यांच्या कन्या होत्या. लिसा मॅरी प्रेस्ली यांच्या निधनामुळे हॉलिवूड कलाविश्वात एकच खळबळ माजली आहे.

लिसा एल्विस प्रेस्ली आई-वडिलांची एकटी मुलगी होती. लिया यांच्या अचानक निधनामुळे कुटुंब आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लिसाच्या निधनानंतर सोशल मीडिया माध्यमातून सेलिब्रिटी आणि चाहते तिला श्रद्धांजली वाहत आहेत. लिसाच्या निधनानंतर अभिनेत्रीच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

लिसाच्या आई म्हणाल्या, ‘या वाईट प्रसंगी आम्हाला साथ दिल्यामुळे आणि प्रार्थना केल्यामुळे तुमचे आभार… ५४ वर्षीय लिसा प्रचंड भावुक, मजबूत आणि सर्वांवर प्रेम करणारी होती. या वाईट प्रसंगातून सावरण्यासाठी आमच्या गोपनियतेचा आदर करा…’ अशी प्रतिक्रिया लिसा यांच्या आईने दिली आहे.

 

 

लिसा यांचा जन्म १९६८ साली झाला होता. लिसा मेम्फिसमध्ये वडील ग्रेस्कलँड हवेलीच्या मालकीण होती. लिसा ९ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. लिसा यांचं लग्न दिवंगत पॉप गायक मायकल जॅक्सन यांच्यासोबत लग्न झालं होतं. पण त्यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही.

मायकल जॅक्सन यांच्यासोबत लिसा यांचं दुसरं लग्न होतं. लिसा यांचं पहिलं लग्न १९९४ साली संगीतकार डॅनी केफ यांच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर फक्त २० दिवसांमध्ये दोघे विभक्त झाले. त्यानंतर लिया यांनी दुसरं लग्न मायटकल जॅक्सन यांच्यासोबत केलं. पण लिसा यांचं दुसरं लग्न देखली टिकलं नाही. अखेर १९९६ साली दोघे विभक्त झाले.

लिसा यांनी तिसरं लग्न २००२ साली केलं. अभिनेता निकोलस केज यांच्यासोबत लिसा यांनी तिसरं लग्न केलं, पण हे लग्न देखील फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या फक्त चार महिन्यांनंतर दोघे विभक्त झाले. त्यानंतर लिसा यांनी चौथं लग्न गिटारवादक आणि संगीत निर्माता मायकल लॉकवूड यांच्यासोबत केलं आणि २०२१ साली दोघांचा घटस्फोट झाला