
‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये मनोज बाजपेयीच्या पत्नीची भूमिका साकारणारी प्रियामणिनं 2003 मध्ये तेलगू चित्रपटात काम केलं हों. त्यानंतर प्रियामणिनं अनेक तेलुगु, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

अनेक दक्षिण चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर प्रियामणि रावण या चित्रपटात दिसली होती.

यानंतर प्रियामणि रक्तचरित्र या चित्रपटात दिसली आणि या चित्रपटातील तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली.

शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपटामध्ये प्रियामणि 1,2,3,4 गेट ऑन द डान्स फ्लोर या गाण्यात दिसली.

परुथिवीरण या चित्रपटातील प्रियामणिच्या उत्तम अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

प्रियामणि सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फोटो शेअर करते.

प्रियामणिची खास गोष्ट म्हणजे ती हॉट अवतारसोबतच पारंपारिक लुकमध्येही आपल्या सौंदर्यासह सर्वांना वेड लावते.

प्रियामणिने 2017 साली मुस्तफा राजसोबत लग्न केलं आणि त्याच्यासोबत ती रोमँटिक फोटो शेअर करत असते.

प्रियामणि वास्तविक जीवनात जितकी चांगली अभिनेत्री आहे. ती परिपूर्ण कौटुंबिक महिला आहे.

प्रियामणिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच अजय देवगनसोबत मैदान या चित्रपटात झळकणार आहे.