अर्चिता फुकनच्या त्या फोटोंचं गुपित समोर, एक्स बॉयफ्रेंडनेच घात केला; धक्कादायक कांड समोर!

गेल्या काही दिवसांपासून अर्चिता फुकन हे नाव चर्चेत आहे. आता तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

अर्चिता फुकनच्या त्या फोटोंचं गुपित समोर, एक्स बॉयफ्रेंडनेच घात केला; धक्कादायक कांड समोर!
archita phukan
| Updated on: Jul 14, 2025 | 5:32 PM

Archita Phukan Viral Photos : गेल्या काही दिवसांपासून अर्चिता फुकन हे नाव सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर तिचं बेबीडॉल आर्ची या नावाने खातं आहे. या खात्यावर तिचे लाखोंनी फॅन्स आहेत. मात्र आता तिच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंटरनेटवर तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. याच फोटोंबाबत तिच्या एक्स बॉयफ्रेंडने रचलेला मोठा कांड समोर आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

आसाम राज्यातील डिब्रूगड या भागातून एका व्यक्तीला शनिवारी (12 जुलै) अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रीतम बोरा असे त्याचे नाव असून तो अर्चिता फुकन हिचा एक्स बॉयफ्रेंड आहे. त्यानेच अर्चिता फुकन हिचे सोशल मीडियावर बनावट खाते चालू केले होते आणि अर्चिताचे मॉर्फ केलेले फोटो अपलोड केले होते. पोलिसांनी त्याला आता बेड्या ठोकल्या आहेत. अर्चिताची बदनामी व्हावी तसेच तिचे शोषण व्हावे यासाठी आरोपीने हा कट रचला होता.

प्रीतम बोरा हे मूळचा टिनसुकिया येथील रहिवासी आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून तो अर्चिता फुकनचे फेक अकाऊंट चालवत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अर्चिताच्या भावाने पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मॉर्फ केलेले फोटो केले अपलोड

अर्चिता फुकन ही सोशल मीडियावर बेबीडॉल आर्ची या नावाने प्रसिद्ध आहे. तिनेच सांगितल्यानुसार एका फेक अकाउंटवर अर्चिता आणि अमेरिकेतली एका अडल्ट स्टारसोबत मॉर्फ केलेले फोटो अपलोड करण्यात आले होते. हे फोटो अर्चिताचे मित्र तसेच जवळच्या लोकांपर्यंत पोहोचले. त्यानंतर हा सर्व प्रकार अर्चिताला समजला.

फोन, लॅपटॉप जप्त

पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी प्रीतम बोरा गेल्या काही दिवसांपासून लपून बसला होता. मात्र पोलिसांनी त्याचा फोन ट्रेस करून त्याला टिनसुकिया येथून बेड्या ठोकल्या. तो तिथे भाड्याच्या घरात राहात होता. त्याच्याकडून फोन, लॅपटॉप जप्त करण्यात आला असून ही सर्व उपकरणं फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आली आहेत.

अर्चिता फुकनसोबत बोराने असं का केलं?

आरोपी बोरा याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली आहे. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्चिताचे जुने फोटो अपलोड करण्यापूर्वी ते मी एडीट केले होते, असे बोराने मान्य केले आहे. अर्चितासोबतचं नातं संपल्यामुळे मला राग आला होता. निराशेतून मी हे काम केलं, असं त्याने सांगितलं आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.