Mohammed rafi song : प्रत्येक बापाला भावुक करतं रफी साहेबांचं हे गाणं, स्वतःही स्टुडिओतच ढसाढसा रडलेले, अतिशय हळवा किस्सा!

मोहम्मद रफी यांनी गायलेल्या 'बाबुल की दुआएं लेती जा' या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान त्यांना स्वतःच्या मुलीच्या लग्नाची आठवण झाली होती. त्यामुळे गाताना त्यांचे डोळे पाणावले. जाणून घ्या या अजरामर गाण्यामागची हळवी कहाणी.

Mohammed rafi song : प्रत्येक बापाला भावुक करतं रफी साहेबांचं हे गाणं, स्वतःही स्टुडिओतच ढसाढसा रडलेले, अतिशय हळवा किस्सा!
Mohammed rafi song
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 11, 2026 | 10:47 PM

काही गाणी केवळ त्यांच्या सुरांमुळे लक्षात राहत नाहीत, तर त्यामागच्या भावनांमुळे कायम मनात घर करतात. विशेषतः मुलीच्या लग्नात तिची पाठवणी करताना वाजणारं एखादं गाणं ऐकलं की अनेकांच्या डोळ्यांत पाणी येतं. असंच एक गाणं आहे, जे गाताना खुद्द गायकालाच आपले अश्रू आवरता आले नव्हते. या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान मोहम्मद रफी इतके भावूक झाले की त्यांच्या आवाजातूनही ते दुःख जाणवत होतं.

मुलीच्या आठवणींनी रफी झाले भावूक

मोहम्मद रफी यांनी आपल्या आवाजाने अनेक अजरामर गाणी दिली. मात्र, एका गाण्याच्या रेकॉर्डिंगचा अनुभव त्यांच्या आयुष्यातही भावनिक ठरला. ‘नील कमल’ या 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी त्यांना मुलीच्या पाठवणीचं गाणं गाण्याची संधी मिळाली होती.

Loading...

या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या आसपासच रफी यांच्या मुलीचं लग्न होतं. त्यामुळे गाण्याचे शब्द गाताना त्यांना स्वतःच्या मुलीच्या लग्नाची आणि तिच्या पाठवणीची आठवण झाली. ते गाण्यात इतके गुंतले की रेकॉर्डिंगदरम्यान त्यांचे डोळे पाणावले. हे गाणं म्हणजे ‘बाबुल की दुआएं लेती जा’. ऐकताना आजही अनेक वडिलांच्या मनात आपल्या मुलीच्या आठवणी जाग्या होतात. या अनुभवाचा उल्लेख रफी यांनी एका मुलाखतीत केल्याचं सांगितलं जातं.

आजही मुलीच्या पाठवणीवेळी हेच गाणं

या गाण्याचे बोल साहिर लुधियानवी यांनी लिहिले होते, तर संगीतकार रवी यांनी त्याला संगीत दिलं होतं. चित्रपटात बलराज साहनी आणि वहीदा रहमान यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं. पडद्यावर मुलीला निरोप देणाऱ्या वडिलांची भावना बलराज साहनी यांनी आपल्या अभिनयातून प्रभावीपणे मांडली.

विशेष म्हणजे, चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झाली तरी या गाण्याचं महत्त्व कमी झालेलं नाही. आजही अनेक लग्नांमध्ये मुलीची पाठवणी करताना हे गाणं आवर्जून लावलं जातं. गाण्याचे शब्द, रफी यांचा भावपूर्ण आवाज आणि त्यामागची खाजगी जीवनातील आठवण यामुळे ते केवळ चित्रपटापुरतं मर्यादित राहिलं नाही.

 

 

गाण्याचे बोल

बाबुल की दुआएँ लेती जा

जा तुझको सुखी संसार मिले

बाबुल की दुआएँ लेती जा

जा तुझको सुखी संसार मिले

मैके की कभी ना याद आए

ससुराल में इतना प्यार मिले

बाबुल की दुआएँ लेती जा

जा तुझको सुखी संसार मिले

नाज़ों से तुझे पाला मैंने

कलियों की तरह फूलों की तरह

बचपन में झुलाया है तुझको

बाँहों ने मेरी झूलों की तरह

मेरे बाग़ की ऐ नाज़ुक डाली

तुझे हर पल नई बहार मिले

मैके की कभी ना याद आए

ससुराल में इतना प्यार मिले

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us