Monalisa : पहिला चित्रपट आहे म्हणून माझ्यावर रेप करणार का? लग्नानंतर मोनालिसाचे डायरेक्टवर खळबळजनक आरोप

Monalisa : मोनालिसा-फरमानच्या लग्नाने सर्वात मोठा धक्का सनोजलाच बसला आहे. मोनालिसाने माझा पहिला चित्रपट अडचणीच आणालय असं मीडियाशी बोलताना सनोज बोलला. चित्रपटात एक गाणं मोनालिसासोबत शूट होणार होतं.

Monalisa : पहिला चित्रपट आहे म्हणून माझ्यावर रेप करणार का? लग्नानंतर मोनालिसाचे डायरेक्टवर खळबळजनक आरोप
monalisa
Image Credit source: instagram
| Updated on: Mar 25, 2026 | 3:02 PM

महाकुंभमुळे रातोरात सेंसेशन बनलेल्या मोनालिसाला चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्राने स्टार बनवलं. ‘द डायरी ऑफ मणिपूर’मध्ये तिला हिरॉईन म्हणून घेतलं. अभिनयाचं ट्रेनिंग दिलं. पण फरमान खानशी लग्न केल्यापासून मोनालिसा बदलली आहे. मोनालिसाच्या लग्नाला तिच्या कुटुंबियांनी आणि सनोज मिश्राने लव्ह जिहादचं नाव दिलय. त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. या सगळ्या वादात मोनालिसाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सनोज मिश्राला खडेबोल सुनावले. मोनालिसाने तिच्या डेब्यू फिल्मचा डायरेक्टर सनोज मिश्रावर छेडाछाडीचा आरोप केलाय. “सनोज मिश्राने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मी जेव्हा कुटुंबाला या बद्दल सांगितलं, तेव्हा त्यांनी काही केलं नाही उलटं मलाच गप्प बसायला सांगितलं” असं मोनालिसा म्हणाली.

“माझ्याकडे आणि फरमानकडे आता फक्त एकच मार्ग उरला आहे. तो म्हणजे जीवन संपवणं. जर, दिल्ली आणि मध्य प्रदेश सरकारने आमची मदत केली नाही तर आम्ही आमचं जीवन संपवू. त्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाहीय. खुलेआम आम्हाला कापण्याची, मारण्याची धमकी मिळत आहे. आमचे पोस्टर जाळले जात आहेत. मी सर्व सरकारांना हात जोडून विनंती करते की आम्हाला मदत करा” केरळमध्ये मोनालिसा मीडियाशी बोलत होती.

कारण तो खूप घाणेरडा माणूस आहे

“सनोज मिश्रा म्हणतायत की, त्यांना माझं नाव घेताना लाज वाटतेय. ती माझ्या चित्रपटात काम करणार नाही. मला स्वत:ला त्यांच्या चित्रपटाचा भाग बनायचं नाहीय. कारण तो खूप घाणेरडा माणूस आहे. त्यांचं नाव घेताना मला लाज वाटते. तो छोट्या-छोट्या मुलींना चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून छेडछाड करतो. तो म्हणतो मी चित्रपटात तुला रोल देईन. पण चित्रपटाच्या नावावर तो चुकीचं काम करतो” असे मोनालिसाने सनोज मिश्रावर आरोप केले.

म्हणून माझ्यावर रेप करणार का?

मोनालिसा रडत रडत म्हणाली की, “सनोज मिश्रा चांगला माणूस नाहीय. त्याने 10 वेळा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी माझ्या कुटुंबाला या बद्दल सांगितलं तर त्यांनी साथ दिली नाही. माझ्यासोबत अन्याय झालाय. मला न्याय पाहिजे” “सनोजने मला स्पर्श केला तेव्हा कुटुंबाने सांगितलं की, पहिला चित्रपट आहे. मग, पहिला चित्रपट आहे म्हणून माझ्यावर रेप करणार का?” मोनालिसाच्या या आरोपांवर डायरेक्टर सनोज मिश्रा यांनी काही उत्तर दिलेलं नाहीय.

Follow Us