Mouny Roy Suraj nambiar wedding : ‘दोन जीवांचं मिलन’, सौंदर्याची खाण मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरजसोबत आज लग्नबंधनात अडकणार!
लाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणारी बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत आज (27 जानेवारी) लग्नगाठ बांधणार आहे.

मुंबई : लाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणारी बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयच्या (Mouny Roy) घरी लगीनघाई बघायला मिळतेय. तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar) आज (27 जानेवारी) ती लग्नगाठ बांधणार आहे.
कोण आहे सूरज नांबियार?
सूरज मूळचा बंगळुरुचा पण कामानिमित्त तो दुबईत असतो. तो प्रसिद्ध बँकर आहे. तसंच त्याचा बिझनेसदेखील आहे. 2019 ला सूरज आणि मौनी यांची दुबईत एका पार्टीदरम्यान भेट झाली. मग दोघा्ंची मैत्री झाली आणि नंतर ती मैत्री प्रेमात रूपांतरित झाली. मग दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
मौनी आणि सूरज यांचं हे शाही लग्न एक डेस्टीनेशन वेडिंग आहे. या दोघांनीही दुबईत नव्हे तर गोवा डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं आहे. या लग्न सोहळ्याला या दोघांच्या कुटुंबातील लोक आणि त्यांचे मोजके मित्रमंडळी उपस्थित असतील.
मौनी रॉय गोव्यात लग्नगाठ बांधतेय
या अलिशान लग्नासाठी एक फाईव्ह स्टार रिसॉर्ट बुक करण्यात आलं आहे. या दोघांच्या घरातील मंडळी, आणि मित्र इथं पोहोचले आहेत. लग्नाची धामधूम सुरू आहे. लग्नाला येणार्या पाहुण्यांसाठी खास सोय करण्यात आली आहे. शिवाय सर्व पाहुण्यांना त्यांचे लसीकरण प्रमाणपत्रसुद्धा सोबत ठेवण्यास सांगितले आहे.
लग्नानंतर उद्या (28 जानेवारी) एक डान्स फंक्शन असेल. ज्यामध्ये मौनी रॉयचे जवळचे मित्र आणि डान्स रिअॅलिटी शोचे प्रतीक उतेकर आणि राहुल शेट्टी परफॉर्म करतील, अशी माहिती आहे. या रिसेप्शनलाही मोजक्या लोकांनाच आमंत्रण असल्याचं कळतंय.
संबंधित बातम्या