Honsla Rakh Review : पहिल्याच चित्रपटात शेहनाझची धूम, दिलजित दोसांजच्या कॉमेडीने जिंकली प्रेक्षकांची मने!

शहनाज गिल (Shehnaaz Gill) आणि दिलजीत दोसांझ (Diljit Dosanj) अभिनीत 'हौसला रख' (Honsla Rakh) या पंजाबी चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धडक मारली आहे. हा चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Honsla Rakh Review : पहिल्याच चित्रपटात शेहनाझची धूम, दिलजित दोसांजच्या कॉमेडीने जिंकली प्रेक्षकांची मने!
Honsla Rakh

मुंबई : शहनाज गिल (Shehnaaz Gill) आणि दिलजीत दोसांझ (Diljit Dosanj) अभिनीत ‘हौसला रख’ (Honsla Rakh) या पंजाबी चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धडक मारली आहे. हा चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. शहनाज आणि दिलजीतचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. पहिल्यांदाच शहनाज टीव्हीचा पडदा सोडून मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहे.

दोन आठवड्यांपूर्वी, दिलजीतने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून त्याचा अधिकृत ट्रेलर शेअर केला. ट्रेलर रिलीज होताच व्हायरल झाला होता. दिलजीत दोसांझची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे, त्याचप्रमाणे शहनाजचा चाहता वर्गही काही कमी नाही. या ट्रेलरने 2 आठवड्यांत YouTube वर विक्रमी 24 दशलक्ष दृश्ये मिळवली आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात दिलजीत दोसांझ आणि शहनाज गिल यांच्यासोबत सोनम बाजवा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमरजीत सिंग सारून यांनी केले आहे आणि राकेश धवन यांनी कथा लिहिले आहे.

मजेशीर कथानक

सर्वप्रथम, हा कॉमेडी ड्रामा प्रकारचा पंजाबी चित्रपट आहे. ही कथा अशा दोन जोडप्यांची आहे, जे चुकून पालक बनतात. आई झाल्यानंतर शहनाज दिलजीतला शिव्या देऊ लागते. नंतर, शहनाज तिच्या मुलाची जबाबदारी त्याच्यावर सोपवून दिलजीतपासून वेगळी होते. छोट्या मुलाबरोबर दिलजित एकटाच अडकतो. संपूर्ण कथा एका वडिलांच्या मुलाच्या संगोपनाच्या संघर्षाभोवती फिरते. दिलजीत आपल्या मुलासाठी आई शोधतो आणि जुने प्रेम विसरण्याचा प्रयत्न करतो. तो शहनाज आणि त्याच्या मुलाला चांगले संगोपन देऊ शकेल का? विभक्त झाल्यानंतर शहनाज दिलजीतला भेटू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.

दिलजीत आणि शहनाज हिट जोडी

हा एक हलकाफुलका विनोदी चित्रपट आहे, ज्याचे कथानक अतिशय सामान्य आहे. ते तुमच्यासमोर मजेदार पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात पिता-पुत्रातील बंधन सुंदरपणे दाखवण्यात आले आहे, जे तुम्हाला रडवण्याऐवजी तुम्हाला हसवेल. दिलजीत अशा पात्रांचा मास्टर आहे, तो सहजपणे अशा पात्रांमध्ये येऊ शकतो. शहनाज गिल या चित्रपटात खूप क्युट वाटली आहे. दिलजीत जास्त फोकसमध्ये असला तरी शहनाजचा जितका भाग आला तितका तिने चांगला अभिनय केला आहे. या चित्रपटात सोनम बाजवा हॉट दिसली आहे, ती पंजाबी सिनेमाची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.

चित्रपटाची गाणी आधीच हिट झाली आहेत. चित्रपटाची साधी कथा असूनही, पटकथा मनोरंजक आहे. दिलजीतची विनोदी शैली तुम्हाला हसवते आणि गुदगुल्या करते. यात शंका नाही की दिलजीत हा पंजाबी सिनेमाचा सुपरस्टार आहे आणि त्याचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांना आवडतो आणि तो आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना कधीही निराश करत नाही. जर, तुम्हाला हलकेफुलके कौटुंबिक नाटक विनोदी चित्रपट आवडत असतील तर तुम्हाला दिलजीत दोसांझ आणि शहनाज गिल यांचा हा चित्रपट आवडेल.

हेही वाचा :

Kajol : लाख मोलाची बनारसी साडी परिधान करत काजोलची दुर्गा पूजेला हजेरी, शेअर केले फोटो

Shweta Tiwari : वयाच्या 41 व्या वर्षीही तितकीच हॉट, श्वेता तिवारी समोर तरूण अभिनेत्रीही ठरतील फेल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI