Kajol : लाख मोलाची बनारसी साडी परिधान करत काजोलची दुर्गा पूजेला हजेरी, शेअर केले फोटो

काजोलने दुर्गा नवमीच्या विशेष प्रसंगी घातलेली साडी हाताने बनवलेली होती. साडीच्या आजूबाजूला सुंदर सोनेरी रंगाची बॉर्डर आहे, ज्यात गोटा-पट्टीचं भरतकाम केलं आहे. (Kajol attends Durga Puja wearing a Banarasi sari, shared photo)

1/7
दुर्गापूजेचा सण बॉलिवूडमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. अभिनेत्री काजोल नवमीचा सण साजरा करताना दिसली. काजोल तिची आई तनुजा, बहीण तनिषा मुखर्जीसोबत सुंदर निळ्या रंगाची साडी परिधान करून दुर्गा पंडालवर पोहोचली.

2/7
काजोलने दुर्गा नवमीच्या विशेष प्रसंगी घातलेली साडी हाताने बनवलेली होती. साडीच्या आजूबाजूला सुंदर सोनेरी रंगाची बॉर्डर आहे, ज्यात गोटा-पट्टीचं भरतकाम केलं आहे.

3/7
याशिवाय काजोलच्या साडीच्या बॉर्डरवर लहान मोती आणि जरीची सुंदर कारागिरीही करण्यात आली आहे, जी साडीला शाही टच देत आहे.

4/7
काजोलने तिची निळी साडी गोल्डन स्लीव्हलेस ब्लाउजसह कॅरी केली होती. यासोबतच अभिनेत्रीने निळ्या रंगाची पर्सही कॅरी केली.

5/7
निळ्या-सोनेरी साडीच्या रंगात सुवर्ण कानातले आणि जुळणाऱ्या बांगड्या घालून अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला. या लूकमध्ये काजोल खूप सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंचा बोलबाला आहे.

6/7
हेअरस्टाईलबद्दल बोलायचं झालं तर, या लूकसह काजोलने तिच्या केसांमध्ये पोनीटेल बनवली आहे. काजोल एका ग्लॉसी बेस, आयलाइनर आणि ब्लू साडीवर गडद किरमिजी रंगाच्या लिपस्टिकमध्ये आकर्षक दिसत होती. अभिनेत्रीने तिच्या कपाळावर एक लहान टिकली लावली, जी तिच्या साडीला पूर्ण करत आहे.

7/7
जर तुम्हाला काजोलची ही साडी आवडली असेल आणि सणासुदीच्या काळात तुम्हाला हा लूक कॅरी करायचा असेल तर तुम्ही ती ऑनलाईन खरेदी करू शकता. अनिता डोंगरे यांच्या वेबसाईटवरील या बनारसी साडीची किंमत 80,000 रुपये आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI