Mukesh Ambani यांच्या तीन मुलांपैकी कोण आहे उच्च शिक्षित?

मुकेश अंबानी यांनी देखील परदेशात शिक्षण घेतलं, पण....; अंबानी कुटुंबातील मुलांचं देखील परदेशात शिक्षण झालं, त्यांच्या तीन मुलांपैकी कोण आहे उच्च शिक्षित?

Mukesh Ambani यांच्या तीन मुलांपैकी कोण आहे उच्च शिक्षित?
| Updated on: Apr 15, 2023 | 10:08 AM

मुंबई : जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबाची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अंबानी कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अंबानी कुटुंबातील महिलांकडे असणाऱ्या महागड्या वस्तूंची कायम सर्वत्र चर्चा रंगलेली असते. पण सध्या अंबानी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जोरदार चर्चा रंगत आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना तीन मुलं आहे. त्यांच्या मुलीचं नाव ईशा अंबानी तर, दोन मुलांचं नाव आकाश अंबानी आणि अनंत अंबानी असं आहे. तिघांचं शिक्षण परदेशात झालं. पण तिघांपैकी कोण उच्च शिक्षित आहे? हे आज जाणून घेणार आहोत. सध्या सर्वत्र अंबानी कुटुंबाच्या मुलांची चर्चा रंगत आहे.

भारतातील सर्वत श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. भारतातच नाही तर, परदेशात देखील अंबानी नावाची चर्चा असते. मुकेश अंबानी यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबाबद्दल देखील सर्वांना माहिती आहे. मुकेश अंबानी यांनी देखील त्यांचं शिक्षण परदेशातून घेतलं आहे. पण त्यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही.

मुकेश अंबानी यांनी Institute of Chemical Technology Mumbai मधून केमिकल इंजिनियरिंमध्ये पदवी घेतली. त्यानंतर एमबीए पूर्ण करण्यासाठी मुकेश अंबानी Stanford University येथे गेले. शिक्षण पूर्ण करत असताना १९८० मध्ये त्यांना रिलायन्स कंपनीमध्ये काम करावं लागलं. म्हणून त्यांना शिक्षण सोडून भारतात परत यावं लागलं.

ईशा अंबानी यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर, ईशा यांनी धीरुभाई अंबानी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील येल युनिव्हरसीटीमधून सायकोलॉजीमध्ये पदवी घेतली. सायकोलॉजीमध्ये पदवी घेतल्यानंतर ईशा अंबानी यांनी Stanford University येथून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. शिवाय ईशा यांनी एका जाहिरात कंपनीमध्ये बिझनेस एनालिस्ट म्हणून काम देखील केलं.

आकाश अंबानी यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी धीरुभाई अंबानी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आकाश यांनी अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हरसीटीमधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी अर्थशास्त्र या विषयात डिग्री घेतली आहे.

मुकेश आणि नीता अंबानी यांचा लहान मुलहा अनंत अंबानी यांनी देखील धीरुभाई अंबानी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मोठ्या भावाप्रमाणे मेरिकेतील ब्राऊन युनिव्हरसीटीमधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. अंबानी कुटुंबातील तीन मुलांमध्ये ईशा अंबानी उच्च शिक्षित आहेत. ईशा यांच्याकडे पोस्ट ग्राज्यूएशन म्हणजे मास्टर्सची देखील डिग्री आहे.