Mumbai Thane TV Actress: हॉटेल रुम, नको ते कृत्य, जाळ्यात अडकली अभिनेत्री; ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Thane TV Actress : नको ते कृत्य सुरु असताना हॉटेलच्या 'त्या' रुममध्ये कशी अडकली अभिनेत्री? ठाण्यात असं काय घडलं ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजलेली... जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय?

ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची पोलिसांनी सुटका केली असून एका महिलेला अटक केली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून ह्युमन ट्रॅफिकिंग आणि सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. एका भयानक रॅकेटमधून अभिनेत्रीची सुटका झाल्याची माहिती समोर येत आहे. तर ही टोळी मनोरंजन विश्वातील महिलांना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ढकलत होती… ही माहिती पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी सापळा रचत कारवाई केली आणि एका महिलेला याप्रकरणी अटक केली आहे. तर या रॅकेट आणखी किती आरोपी आहेत… याचा कसून शोध पोलीस घेत आहेत.
ठाण्यात सेक्स रॅकेटचा भंडाफोड झाला असल्याची माहिती समोर येताच परिसरात खळबळ उडाली. समोर येत असलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी 8 ऑक्टोबर रोजी मोठी कारवाई केली. पोलिसांना मीरा – भायंदर येथील हॉटेलमध्ये नकली ग्राहक पाठवलेले… यानंतर पोलिसांनी मोठ्या हुशारीने मोठं रॅकेट समोर आणलं… अटक करण्यात आलेल्या महिलेवर, कथितरित्या अन्य महिलांना देहविक्री करण्यास भाग पाडत होती. ती त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचं सत्य समोर आलं आहे. अभिनेत्रींना देखील संबंधित महिला या जाळ्यात अडकवत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातून सूटका करण्यात आलेल्या अभिनेत्रने टीव्ही आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. पण आता या अभिनेत्रीची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, या रॅकेटच्या टोळीनं विशेषत: मनोरंजन विश्वातील महिलांना टार्गेट केलं होतं. जे टेलिव्हिजन मालिका, वेब सिरीज आणि फोटोशूट करतात. सध्या अटकेत असलेल्या महिलेच्या पुरुष साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
याआधी देखील ठाण्यातील वागळे इस्टेट याठिकाणी सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी फर्दा फाश केलेला. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मोठी कारवाई करत, 2 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केलेली. याप्रकरणी पोलिसांनी वागळे इस्टेटमधून प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक केलं होतं. वागळे इस्टेट परिसरातील बार अँड रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी सापळा रचला आणि सेक्स रॅकेटची पर्दाफाश केला.
अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रीने तब्बल 10 वेबसिरीज आणि 3 भोजपुरी सिनेमांमध्ये काम केल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्री महिला व मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणणार असल्याची पोलिसांना मिळाली माहिती होती. अशात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन महिलांची सुटका केली आहे.