Narendra Modi: हिवाळी अधिवेशनापूर्वीच दिल्लीत घाडामोडींना वेग, मोदी सरकारचे मोठे संकेत
PM Narendra Modi to Minister: देशाच्या राजधानीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. '15 डिसेंबरपर्यंत परदेशात जाऊ नका' असा थेट संदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच दिल्लीत बड्या घडामोडी घडत आहेत.

PM Narendra Modi to Minister: संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठीच्या घाडमोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांना मोठे निर्देश दिले. 15 डिसेंबरपर्यंत परदेशात जाऊ नका असा थेट संदेशच पंतप्रधानांनी दिले. हिवाळी अधिवेशनातील प्रश्नोत्तरासाठी संबंधित मंत्रालयाने तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात मतदार संघ पुनर्रचना बिल आणि महिला आरक्षण विधेयक सरकार सादर करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी हे निर्देश देण्यात आल्याने त्याविषयीची मोठी चर्चा सुरू आहे. संसदीय कॅबिनेट कार्य समिती हिवाळी अधिवेशनाची तारीख लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.
100 दिवसांपासून संसदीय अधिवेशनाची प्रतिक्षा
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक झाली. त्यात आगामी हिवाळी अधिवेशनाविषयी चर्चा झाली. विरोधक सातत्याने हिवाळी अधिवेशनाला विलंब झाल्याचा आरोप करत आहेत .बुधवारी रात्रीपर्यंत पावसाळी अधिवेशनाला औपचारिकपणे स्थगिती दिल्याचे जाहीर झालेले नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज 13 ऑगस्ट रोजी अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आले होते. पण त्यानंतर 100 दिवसांहून अधिक काळ उलटला आहे. नवीन अधिवेशनाची तारीख जाहीर न झाल्याने विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सत्रात मतदार संघ पुनर्रचना बिल आणि महिला आरक्षण विधेयक सादर होण्याची शक्यता आहे.
दोन तृतीयांश बहुमत मिळवणार?
आगामी अधिवेशनात सरकार घटनादुरुस्ती विधेयक सादर करेल. 131 वी घटनादुरुस्ती विधेयक, 2026 सादर करण्यात येईल. हे विधेयक मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणा विधेयकाशी संबंधित आहे. 17 एप्रिल रोजी संसदेच्या विशेष सत्रात सरकार बहुमत न मिळाल्याने तोंडावर आपटले होते. त्यावेळी दोन्ही विधेयक बहुमता अभावी बारगळले होते.
या विधेयकांना लोकसभेत मंजुरीसाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. म्हणजे सरकारला 361 खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सध्याच्या 543 सदस्यीय संसदेत तीन पदं रिक्त आहेत. सध्या एकूण 540 सदस्य आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (NDA) 320 खासदारांचे बहुमत आहे. यामुळे सरकारला विरोधकांची मनधरणी करावी लागत आहे. विरोधी बाकावरील काही पक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न सरकार गेल्या सहा महिन्यांपासून करत आहे. हे विधेयक बारगळताच पहिला परिणाम पश्चिम बंगालमध्ये लागलीच दिसून आला. ममता बॅनर्जी यांचा पक्ष फुटला आणि एक मोठा गट स्वतंत्र होऊन नंतर दुसऱ्या पक्षात गेला.
