Aishwarya-Abhishek Bachchan: लेक आराध्यासह माहेरी पोहोचली ऐश्वर्या, पण अभिषेक बच्चन मात्र गायब; बहीण श्वेताकडून पोलखोल
ऐश्वर्या राय बच्चनने मुलगी आराध्यासह वहिनी श्रीमा रायच्या वाढदिवसाला हजेरी लावली. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र या फोटोंमध्ये अभिषेक बच्चन कुठेच दिसला नाही. त्याचवेळी बहीण श्वेता बच्चनने अभिषेक आणि आई जया बच्चनसोबतचा फोटो शेअर केला. त्यामुळे पुन्हा एकदा बच्चन कुटुंब चर्चेत आलं आहे.

Aishwarya-Abhishek Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा नेहमीच होत असते. दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात. आता पुन्हा एकदा हे जोडपं चर्चेत आलं आहे. निमित्त आहे ऐश्वर्याची वहिनी श्रीमा राय हिच्या वाढदिवसाचं. ऐश्वर्या मुलगी आराध्यासह या खास सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. मात्र या कौटुंबिक सोहळ्याच्या फोटोंमध्ये अभिषेक बच्चन दिसला नाही. त्यानंतर अभिषेक नेमका कुठे होता, असा प्रश्न चाहत्यांना पडला. याचदरम्यान त्याची बहीण श्वेता बच्चनने शेअर केलेल्या या फोटोमुळे या चर्चेला आणखी उधाण आलं आहे.
ऐश्वर्याच्या वहिनीच्या वाढदिवसाला खास सेलिब्रेशन
ऐश्वर्याची वहिनी श्रीमा राय हिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये ऐश्वर्या राय, तिची मुलगी आराध्या, आई वृंदा राय आणि कुटुंबातील इतर सदस्य दिसत आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या साध्या लूकमध्ये दिसत असून आराध्याने सुंदर ड्रेस आणि डोक्यावर क्राऊन परिधान केला आहे. आई आणि मुलीचा हा फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. श्रीमाने या फोटोंसोबत खास कॅप्शनही लिहिलं आहे. ‘कॅमेऱ्यात कैद झालेला वाढदिवस… कृतज्ञता, फुलं, सरप्राइज, थोडी मजा आणि मुलं, सासूबाईंसोबत घालवलेली संध्याकाळ’, अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
पहा फोटो-
View this post on Instagram
अभिषेक बच्चन कुठे होता?
ऐश्वर्या आणि आराध्या श्रीमाच्या वाढदिवसाला उपस्थित असताना अभिषेक मात्र या फॅमिली फोटोमध्ये दिसला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना सुरुवात झाली. मात्र, याचदरम्यान श्वेता बच्चनने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोत श्वेता, तिची आई जया बच्चन आणि भाऊ अभिषेक बच्चन एकत्र दिसत आहेत. तिघांनीही पारंपरिक कपडे परिधान केले आहेत. या फोटोमुळे अभिषेक त्या वेळी आपल्या आई आणि बहिणीसोबत असल्याचं समोर आलं.
पहा फोटो-
View this post on Instagram
पुन्हा चर्चेत ऐश्वर्या-अभिषेकची जोडी
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी मुंबईत मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला एकत्र हजेरी लावली होती. यावेळी दोघंही हातात हात घालून कार्यक्रमात पोहोचले होते. त्यांच्या एकत्रित उपस्थितीने चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं. आता श्रीमाच्या वाढदिवसाच्या फोटोंमुळे पुन्हा एकदा बच्चन कुटुंब चर्चेत आलं आहे.
