Kareena Kapoor Khan: कोणाला माहिती होते… सैफ आणि करिश्माचा रोमॅन्स करतानाचा Video करिनाने शेअर केला अन्…
Kareena Kapoor Khan: बॉलिवूडची बेबो म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करिना कपूर खानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सैफ करिश्मासोबत रोमॅन्स करताना दिसत आहे.

बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सैफ अली खान हा कायमच चर्चेत असतो. सैफने बॉलिवूडची बेबो करिना कपूर खानशी लग्न केले आहे. पण त्यापूर्वी एका गाण्यामध्ये सैफने करिनाची बहिण करिश्मासोबत रोमॅन्स केला होता. आता जवळपास 27 वर्षांनंतर या गाण्याची चर्चा रंगली आहे. हे गाणे स्वत: करिना कपूर खानने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
करिना कपूर खानने पती सैफ अली खानचा २७ वर्षे जुना सुपरहिट सिनेमा ‘हम साथ साथ हैं’शी संबंधित जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. बुधवारी अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे सैफ अली खान आणि बहीण करिश्मा यांच्या डान्स सीक्वेंसवर मजेशीर प्रतिक्रिया दिली. अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीज सेक्शनवर सैफ अली खान आणि बहीण करिश्मा कपूर यांची एक जुनी डान्स क्लिप शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये सैफ (विनोद) आणि करिश्मा (सपना) कुटुंबातील सदस्यांची नक्कल करताना मस्तीच्या अंदाजात डान्स करताना दिसत आहेत.

Kareena post
करीना कपूरने शेअर केली पोस्ट
करीना कपूरने इंस्टाग्राम स्टोरीवर सैफ आणि करिश्माचा व्हिडीओ शेअर करत, “आज सकाळी उठताच हा व्हिडीओ पाहिला. कोणाला माहीत होते की सैफू आपल्या होणाऱ्या सिस्टर-इन-लॉसोबत डान्स करेल.” यासोबतच अभिनेत्रीने आपल्या पोस्टद्वारे सूरज बडजात्या यांच्या फिल्मप्रति प्रेम व्यक्त केले आणि त्यांचा आगामी सिनेमा ‘ये प्रेम मोल लिया’बाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. “मला ही फिल्म खूप आवडते आणि मला सूरज जी यांच्या फिल्म खूप आवडतात. ‘ये प्रेम मोल लिया’ची वाट पाहत आहे, ज्यासाठी मी सिनेमात जाईन” असे तिने कॅप्शन दिले आहे.
हम साथ साथ हैं बद्दल
सूरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनात बनलेली फिल्म ‘हम साथ साथ हैं’ ५ नोव्हेंबर १९९९ रोजी रिलीज झाली होती आणि त्या वर्षाच्या सर्वात मोठ्या हिट फिल्मपैकी एक होती. फिल्ममध्ये सैफ अली खान यांनी विनोद आणि करिश्मा कपूर यांनी सपनाची भूमिका निभावली होती. यांच्यासोबत सलमान खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, मोहनीश बहल आणि आलोक नाथ यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते.
