AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ तारखांना जन्मलेली मुलं असतात विलक्षण स्मरणशक्ती आणि नेतृत्व गुणांनी संपन्न! आयुष्यात मिळवतात प्रचंड यश!

Numerology Mulank Children: अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट मूलांकांशी संबंधित मुले शांत स्वभावाची असतात. एवढंच नाही तर काही अत्यंत बुद्धिमान असतात आणि त्यांच्यामध्ये उत्तम नेतृत्व गुण असतात. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या मूलांकांशी संबंधित मुलांकडे तीक्ष्ण बुद्धिमत्ता असते.

'या' तारखांना जन्मलेली मुलं असतात विलक्षण स्मरणशक्ती आणि नेतृत्व गुणांनी संपन्न! आयुष्यात मिळवतात प्रचंड यश!
Numerology Mulank Children
| Updated on: Nov 26, 2026 | 9:47 AM
Share

अंकशास्त्रात मूलांकाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीवर त्यांच्या मूलांकाच्या अधिपती ग्रहाचा प्रभाव असतो. त्याच मूलांकानुसार व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये दिसून येतात. लहानपणापासूनच हे गुण त्यांच्यात दिसून येतात. उदाहरणार्थ, काही मुले अत्यंत हुशार असतात, काही स्वभावाने शांत असतात, तर काहींचा स्वभाव आनंदी असतो. मुलांच्या स्वभावातील आणि क्षमतेतील या विविधतेमागे त्यांच्या मूलांकाचा प्रभाव असू शकतो.चला आज जाणून घेऊया की कोणते मूलांक अशा मुलांशी संबंधित आहेत, ज्यांच्याकडे तीक्ष्ण बुद्धिमत्ता, विलक्षण स्मरणशक्ती, उच्च बौद्धिक क्षमता आणि उत्तम नेतृत्व गुण असतात.

मूलांक 1

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक १ असतो. अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 वर सूर्याचे अधिपत्य असते. सूर्याच्या प्रभावामुळे हा मूलांक असलेल्या व्यक्तिमत्त्वात एक विशेष तेज दिसून येते. सूर्याच्या आशीर्वादाने, अशा व्यक्तींमध्ये विलक्षण आत्मविश्वास, ऊर्जा आणि नेतृत्वगुण पाहायला मिळतात. ही मुले नवीन गोष्टी अभ्यासाच्या बाबतीत पुढे असतात. याशिवाय त्यांची स्मरणशक्तीही उत्तम असते. आपल्या गुणांच्या जोरावर ते मोठी प्रसिद्धी मिळवतात. कठोर परिश्रम करतात.

मूलांक 3!

ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला होतो, त्यांचा मूलांक ३ असतो. जन्मापासूनच त्यांचा कल ज्ञानाकडे असतो आणि जसजसे ते मोठे होतात, तसतशी त्यांची अभ्यास आणि शिकण्यामधील रुची अधिक वाढत जाते. मूलांक ३ चा स्वामी ग्रह ‘गुरु’ आहे. अशा व्यक्तींवर गुरु ग्रहाचा प्रभाव असतो.या मुलांनी एकदा का एखादी गोष्ट शिकली की, ते ती गोष्ट विसरता येत नाही. त्यांच्याकडे तर्क करण्याची विलक्षण क्षमता असते.

मूलांक 5

ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला होतो, त्यांचा मूलांक ५ असतो. मूलांक ५ चा स्वामी ग्रह ‘बुध’ आहे, जो बुद्धिमत्ता, संवाद आणि तार्किक विचारांचे प्रतिनिधित्व करतो. या मूलांकाच्या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान असतात. याशिवाय त्यांची स्मरणशक्तीही उत्तम असते. यासोबतच नवनवीन गोष्टी जाणून घेण्याच्या ओढीमुळे ते सतत प्रश्न विचारत असतात. त्यांची तीक्ष्ण बुद्धीच्या असून, नवीन संकल्पना अतिशय वेगाने आत्मसात करतात. ते जिथे कुठे जातात, तिथे एक प्रसन्न वातावरण निर्माण करतात.

(Disclaimer: हा लेख सर्वसाधारण समजुतींवर आधारित आहे; याला अंतिम सत्य मानू नका. मुलाच्या भविष्यासाठी केवळ गुण किंवा गुणांकांवर अवलंबून राहू नका; कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. याची TV९ मराठी पुष्टी करत नाही.)

Follow Us
पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Supriya Sule : पुण्याचं पालकत्व तुम्हीच घ्या; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
Donald Trump : भारतासह 14 व्यापारी भागीदार देशांवर अमेरिका पुन्हा टॅरिफ लावणार?
शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
Rohit Pawar : शरद पवारांंची NCP NDA सोबत गेल्यानंतर रोहित पवारांची रणनीती काय?
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
Abhijeet Dipke : गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा सवाल
पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती स्पष्ट करा; हायकोर्टाचे आदेश
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात