‘धडकन’ सिनेमातील म्युझिक लाँच व्हिडीओ व्हायरल, ऐश्वर्याच्या लूक वेधलं चाहत्याचं लक्ष

Aishwarya Rai Look | ऐश्वर्या रायच्या लूक वेधलं चाहत्याचं लक्ष, साध्या लूकमध्ये अभिनेत्रीने केलेली एन्ट्री आजही चर्चेत, 'धडकन' सिनेमातील म्युझिक लाँच व्हिडीओ तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिच्या लूकची चर्चा... अभिनेत्रीला पाहून चाहते म्हणाले...

धडकन सिनेमातील म्युझिक लाँच व्हिडीओ व्हायरल, ऐश्वर्याच्या लूक वेधलं चाहत्याचं लक्ष
| Updated on: Apr 30, 2024 | 3:11 PM

सोशल मीडियावर कायम जुने व्हिडीओ व्हायरल होत असतात. जुने व्हिडीओ पाहिल्यानंतर जुन्या आठवणी देखील ताज्या होतात. अशाच एका सिनेमाच्या प्रीमियरचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला ‘धडकन’ सिनेमाची आठवण येईल. सांगायचं झालं तर, व्हायरल होत असलेला व्हिडिओ धडकनच्या म्युझिक लाँचचा आहे. व्हिडीओमध्ये 90 च्या दशकातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री दिसत आहेत. व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गायक अलका याज्ञिक, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, महिमा चौधरी, शमिता शेट्टी देखील दिसत आहे. पण अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या एन्ट्रीनंतर तिच्या सौंदर्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या… जुना व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते शिल्पा शेट्टी आणि ऐश्वर्या राय यांच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

 

 

इंस्टाग्रामवर star_retrotv नावाच्या पेजवर धडकन सिनेमाच्या प्रिमियम लाँचचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक आणि गायक दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टीने पीच कलरचा इंडो वेस्टर्न ड्रेस घातलेला दिसत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

व्हिडीओमध्ये शिल्पा हिच्यासोबत बहीण शमिता शेट्टी आणि अभिनेत्री महिमा चौधरी दिसत आहेत. गायक अलका याज्ञिक यांच्यानंतर ऐश्वर्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. बेबी पिंक रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री हातात माईक घेऊन काहीतरी बोलताना दिसत आहे.

‘धडकन’ सिनेमाच्या म्युझिक लाँच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर असंख्य नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे एक नेटकरी म्हणला, ‘ शिल्पा आणि ऐश्वर्या यांचं सौंदर्य…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अलका याज्ञिक चांगल्या दिसत आहेत…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘महिमा चौधरी देखील प्रचंड सुंदर दिसत आहे…’

‘धडकन’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 2002 मध्ये दिग्दर्शक धर्मेंश दर्शन यांचा ‘धडकन’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेमात शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार, सुनिल शेट्टी, महिमा चौधरी, सुषमा सेठ, नसीम मुकरी, अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली होती.