अनु मलिक-मोहित चौहान एकत्र, 'व्हिनस'साठी नवं गाणं रेकॉर्ड

मुंबई : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनु मलिक यांनी यश राज फिल्म्स स्टुडिओजमध्ये गाणं रेकॉर्ड केलं आहे. हे गाणं सिनेमासाठी रेकॉर्ड केलंय की अल्बमसाठी हे अद्याप स्पष्ट नसले, तरी यात एक विशेष बाब म्हणजे, हे गाणं प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायलं आहे. गाण्याचे शब्द प्रसिद्ध गीतकार समीर यांनी लिहिले आहेत. संगीतकार अनु मलिक, गायक …

अनु मलिक-मोहित चौहान एकत्र, 'व्हिनस'साठी नवं गाणं रेकॉर्ड

मुंबई : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनु मलिक यांनी यश राज फिल्म्स स्टुडिओजमध्ये गाणं रेकॉर्ड केलं आहे. हे गाणं सिनेमासाठी रेकॉर्ड केलंय की अल्बमसाठी हे अद्याप स्पष्ट नसले, तरी यात एक विशेष बाब म्हणजे, हे गाणं प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायलं आहे. गाण्याचे शब्द प्रसिद्ध गीतकार समीर यांनी लिहिले आहेत.

संगीतकार अनु मलिक, गायक मोहित चौहान आणि गीतकार समीर असे त्रिकुट एकत्र येणार असल्याने कानसेनांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. हे गाणं यश राज फिल्म्स स्टुडिओजमध्ये रेकॉर्ड करत असताना सिनेनिर्माते आणि ‘व्हिनस’ या संगीत कंपनीचे संचालक चंपक जैन हेही उपस्थित होते.

गायक मोहित चौहान आणि संगीतकार अनु मलिक यांनी याआधी ‘अग्ली और पगली’ सिनेमातील ‘याद तेरी आए’ या गाण्यासाठी एकत्रित काम केले होते. हे गाणं प्रचंड हिट झालं होतं. अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि अभिनेता रणवीर शौरी यांच्यावर चित्रित झालं होतं.

आता संगीतकार अनु मलिक, गायक मोहित चौहान आणि निर्माते व ‘व्हिनस’चे संचालक चंपक जैन यांचा यश राज फिल्म्स स्टुडिओतील एकत्रित फोटो समोर आल्याने, सिनेरसिकांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *